भाजीपाल्याला कवडीमोल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:06 AM2018-02-16T00:06:19+5:302018-02-16T00:09:26+5:30
सायखेडा : आवक वाढल्याने गोदाकाठ परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात भाजीपाल्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात कोसळले असून कवडीमोल भावात भाजीपाला विक्री करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सायखेडा : आवक वाढल्याने गोदाकाठ परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात भाजीपाल्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात कोसळले असून कवडीमोल भावात भाजीपाला विक्री करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यातील सायखेडा येथील आठवडे बाजारात शेतकºयांना भाजीपाला कवडीमोल भावात विक्र ी करावा लागला. वांगी, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, कोथिंबीर, टमाटे, दोडका, दुधी भोपळा या भाज्या दोन रुपये ते पाच रुपये प्रति किलो विकाव्या लागल्याने शेतीतून तोडणी करणे आणि बाजारात विक्रीसाठी आणण्याचादेखील खर्च वसूल झाला नाही. त्यामुळे शेतकºयांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कुचंबणा होत आहे.
भावातील चढ उतारामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नगदी पीक म्हणून हिवाळ्यात अनेक शेतकरी भाजीपाला करतात. खरीप हंगामातील सोयाबीन, मका या पिकांच्या काढणी नंतर शेतात कमी कालावधीत पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी भाजीपाल्याकडे वळतो मात्र वाढता खर्च आणि वाढती मजुरी यामुळे भाजीपाला पीक हातात येईपर्यंत प्रचंड खर्च होतो. अलीकडील काळात कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करावा लागतो. खराब हवामान, वाढती थंडी , बेमोसमी पाऊस यामुळे भाजीपाल्याचे नुकसान होत असते.गुरुवारचे बाजारभाववांगी-५ रु . किलो,
टमाटे-२ रु . किलो,
मेथी-५ रु . जुडी,
शेपू-२ रु . जुडी,
फ्लॉवर- १ रु. किलो,
कोबी-२ रु . किलो,
कोथिंबीर-२ रु . जुडी.