निफाडला माफक दरात घरपोच भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:39 PM2020-03-30T17:39:54+5:302020-03-30T17:40:25+5:30

भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी शहरात गर्दी करू नये यासाठी मातोश्री जसोदाबाई सोनी विकास व सेवा केंद्र आणि निफाड नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना माफक दरात थेट घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्र म सुरू करण्यात आला असून या उपक्र मास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

 Vegetable farming at affordable prices to Niphad | निफाडला माफक दरात घरपोच भाजीपाला

निफाडला माफक दरात घरपोच भाजीपाला

Next

निफाड : भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी शहरात गर्दी करू नये यासाठी मातोश्री जसोदाबाई सोनी विकास व सेवा केंद्र आणि निफाड नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना माफक दरात थेट घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्र म सुरू करण्यात आला असून या उपक्र मास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये यासाठी मातोश्री जसोदाबाई सोनी विकास व सेवा केंद्र आणि निफाड नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना माफक दरात थेट घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्र म सुरू करण्यात आला आहे . या संस्थांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधल्यास भाजीपाला एका किटमध्ये घरपोच पोहचवला जात आहे. या किटमध्ये बटाटे, कांदे, हिरवी मिरची, शिमला मिरची, आले, मेथी जुडी, शेपू जुडी , कांदा पात जुडी, वांगे ,टमाटे, एवढ्या १० प्रकारचा भाजीपाला १०० रु पयात ग्राहकांच्या घरी घरपोच केला जात आहे . या भाजीपाल्याची मागणी सकाळी ९ ते १२ या वेळेत स्वीकारण्यात येणार असून त्याची वितरण व्यवस्था सायंकाळी ४ ते ६ या वेळेत करण्यात येत आहे. ग्राहकांना माफक दरात थेट घरपोच भाजीपाला देण्याच्या या उपक्र माचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

Web Title:  Vegetable farming at affordable prices to Niphad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.