हिरावाडीत रस्त्यावर भाजीबाजाराने अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:40 AM2017-10-14T00:40:18+5:302017-10-14T00:40:24+5:30
दर सोमवारच्या दिवशी हिरावाडीतील कमलनगर ते एसएसडीनगरपर्यंत भर रस्त्यावर भरणाºया आठवडे बाजारामुळे वाहतुकीला अडथळा ठरत चालला आहे. या आठवडे बाजारात विक्रेत्यांसह ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने ऐन वाहनचालकांना वाहने नेताना कसरत करावी लागतेच, शिवाय ग्राहकांनाही जीव धोक्यात घालूनच भाजीपाला खरेदी करण्यासाठी यावे लागते.
पंचवटी : दर सोमवारच्या दिवशी हिरावाडीतील कमलनगर ते एसएसडीनगरपर्यंत भर रस्त्यावर भरणाºया आठवडे बाजारामुळे वाहतुकीला अडथळा ठरत चालला आहे. या आठवडे बाजारात विक्रेत्यांसह ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने ऐन वाहनचालकांना वाहने नेताना कसरत करावी लागतेच, शिवाय ग्राहकांनाही जीव धोक्यात घालूनच भाजीपाला खरेदी करण्यासाठी यावे लागते. दर सोमवारी रस्त्यावर भरणाºया या आठवडे बाजारासाठी महापालिका प्रशासनाने परिसरातच मोकळी जागा उपलब्ध करून दिल्यास वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही व नागरिकांनाही जीव धोक्यात घालावा लागणार नाही. हिरावाडीतील कमलनगर भागात भरणाºया आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांपाठोपाठ जवळपासचे शेतकरीदेखील भाजीपाला विक्रीसाठी येतात. परिसरात आठवड्याला भाजीबाजार भरत असल्याने नागरिकांसाठी फायद्याचा असला तरी वाहतुकीच्या रस्त्यावर बाजार बसत असल्याने तो नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने या भाजीबाजारासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही व अपघात टाळता येतील यासाठी मनपा तसेच पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.