दुर्लक्षामुळे फोफावला भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:22 AM2017-07-22T00:22:58+5:302017-07-22T00:23:34+5:30

सातपूर : दिसली जागा की थाटला भाजीबाजार या पद्धतीप्रमाणे शहरात कुठेही भरणारा भाजीबाजार हे आता सर्रास समीकरण ठरले आहे.

Vegetable market due to ignorance | दुर्लक्षामुळे फोफावला भाजीबाजार

दुर्लक्षामुळे फोफावला भाजीबाजार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : दिसली जागा की थाटला भाजीबाजार या पद्धतीप्रमाणे शहरात कुठेही भरणारा भाजीबाजार हे आता सर्रास समीकरण ठरले आहे. स्थानिक नागरिकांची गरज आणि बेरोजगारी यामुळे त्याकडे सामाजिक प्रश्न म्हणून बघितले जात असले तरी भाजीबाजार डोकेदुखी ठरली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सातपूर येथील भाजी मंडईचा प्रश्न असाच निर्माण झाला असून, छत्रपती शिवाजी महाराज मंडई बाहेरील भाजी विक्र ेत्यांचे अतिक्र मण हटविण्यास मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना सपशेल अपयश आले आहे.  सुमारे तीस वर्षांपूर्वी सातपूर गावात महानगरपालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मंडईची उभारणी करण्यात आली. जवळपास ६० गाळे आणि पहिल्या मजल्यावर तेवढेच गाळे बांधण्यात आलेले आहेत. मंडईत भाजी विक्रेत्यांसाठी सोय करण्यात आली आहे. कालांतराने मंडईबाहेर देखील काही भाजी विक्र ेत्यांनी व्यवसाय सुरू केला. त्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊ लागला आणि वादाला सुरु वात झाली आहे. ग्रामस्थांनी मंडई बाहेरील अनधिकृत विक्रेत्यांना हटविण्याची जोरदार मागणी सुरू केली. मनपा प्रशासनाने सुरु वातीला छोटी-मोठी कारवाई केली. दबाव वाढल्याने तीन वर्षांपूर्वी पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबविण्यात आली होती. बॅरिकेडिंग लावण्यात आले होते.
काही दिवस पोलीस बंदोबस्त
ठेवण्यात आला होता. बंदोबस्त हटल्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.
मनपा प्रशासनाने भाजी विक्रेत्यांविरोधात ज्या ज्या वेळी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येक वेळी भाजी विक्रेतेच भारी पडलेले आहेत आणि प्रशासनाला हतबल व्हावे लागले आहे. त्यामुळे रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्रामस्थांचा वाढत दबाव आणि  आक्रमक भाजी विक्र ेते यात मनपा प्रशासन दुबळे पडले आहे. तर लोकप्रतिनिधींनी देखील बघ्याची भूमिका घेतली आहे. हा वाद अजून किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही.

Web Title: Vegetable market due to ignorance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.