बाजार समितीबाहेरच भाजीबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:45 PM2020-06-10T22:45:32+5:302020-06-11T00:51:54+5:30
पंचवटी : कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस संसर्ग वाढत असताना पेठरोडवर शरदचंद्र पवार बाजार समितीच्या बाहेर मुख्य वाहतूक रस्त्यावर सायंकाळी भरणाऱ्या ...
पंचवटी : कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस संसर्ग वाढत असताना पेठरोडवर शरदचंद्र पवार बाजार समितीच्या बाहेर मुख्य वाहतूक रस्त्यावर सायंकाळी भरणाऱ्या भाजीबाजाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांसह नागरिकांना पायी चालणे अवघड होत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी, भाजीपाला विक्रे त्यांनी बेशिस्तपणाचा कळस गाठला असला तरी प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने आगामी काळात पंचवटी कोरोना हॉटस्पॉट बनण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पेठरोडला रोज संध्याकाळी किरकोळ भाजी विक्रे त्यांसह शेतकरी चारचाकी वाहने उभी करून शेतमालाची विक्र ी करतात. शेतकऱ्यांनी आपल्या मालाची बाजार समितीत विक्र ी केली पाहिजे, मात्र काही शेतकरी बाजार समितीत शेतमाल न नेता बाहेरच विक्री करतात. बाजार समिती बाहेर शेतमालाची खरेदी करणाºया व्यापारीवर्गावर कारवाई करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी बाजार समितीचे सभापती यांनी दिले होते. पेठरोडला आरटीओ कार्यालयाबाहेरील रस्त्यावर सायंकाळी शेकडो विक्र ेते व शेतकरी शेतमालाची विक्र ी करतात. परिणामी वाहतूक कोंडी तर होतेच, शिवाय फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून येते. शेकडो ग्राहक व भाजीपाला विक्र ेत्यांची गर्दी होत असल्याने बाजार समितीबाहेरच भाजीपाला विक्र ीमुळे पेठरोडला बाजार समितीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.