अंतर राखून पंचवटीत भरला भाजीबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:13 AM2021-05-15T04:13:10+5:302021-05-15T04:13:10+5:30
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा पंचवटी विभागातील म्हसरूळ, आरटीओ कॉर्नर व पंचवटीत अन्य ठिकाणी जागा निश्चित करून भाजीपाला खरेदी-विक्रीप्रसंगी विक्रेते ...
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा पंचवटी विभागातील म्हसरूळ, आरटीओ कॉर्नर व पंचवटीत अन्य ठिकाणी जागा निश्चित करून भाजीपाला खरेदी-विक्रीप्रसंगी विक्रेते व ग्राहक यांच्यात अंतर राहण्यासाठी विभागीय अधिकारी विवेक धांडे, सहायक अधीक्षक भूषण देशमुख यांच्या उपस्थितीत गुरुवारी पांढऱ्या रंगाचे गोल चौकोनी आकारातील पट्टे मारण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी दुकानदारांनी दुकाने मांडली होती तर ग्राहक देखील आखणी केलेल्या चौकोनात उभे होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला दुकाने बंद केले आहे केवळ अधिकृत भाजीमंडईच्या व जागा निश्चित केलेल्या ठिकाणी विक्रेत्यांना ठरवून दिलेल्या वेळेतच भाजीपाला विक्री करता येईल, असे स्पष्ट केल्याने त्यानुसार जागा निश्चित केल्या आहेत. भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये अंतर रहावे, यासाठी विक्रेत्यांना व भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या सर्व ग्राहकांना पांढऱ्या पट्ट्याची आखणी करून दिलेल्या जागेत उभे राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत परवानगी असल्याने भाजीपाला विक्रेत्यांनी जागा निश्चित केलेल्या ठिकाणी दुकाने थाटली होती.