रस्त्यावर भाजीबाजार

By admin | Published: March 4, 2017 01:25 AM2017-03-04T01:25:42+5:302017-03-04T01:25:57+5:30

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील बापूबंगला बसथांबा लगतच रस्त्यावर सायंकाळी अनधिकृत भरणारा भाजीबाजारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

Vegetable market on the road | रस्त्यावर भाजीबाजार

रस्त्यावर भाजीबाजार

Next

 इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील बापूबंगला बसथांबा लगतच रस्त्यावर सायंकाळी अनधिकृत भरणारा भाजीबाजारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाने सायंकाळी मोहीम राबवून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्याची मागणी होत आहे. रस्ता वाहतुकीसाठी आहे की भाजीबाजारासाठी असा उपरोधक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.
वडाळा-पाथर्डी रस्ता लगत शिवाजीवाडी, विजयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, पांडवनगरी, शरयुनगरी, सराफ
बाजार, समर्थनगरसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहती येण्या-जाण्यास जवळचा रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते, परंतु सायंकाळ होताच वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील बापू बंगला बसथांबा येथील परिसरात सुमारे १५ ते २० भाजीविक्रेते रस्त्यावर दुतर्फा ठाण मांडून बसतात. त्यांच्याकडे येणारे ग्राहक सुद्धा आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे १०० फुटी रस्ता अक्षरश: कमी पडतो. त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनले आहे.
लहान शिवाय मोठे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यापूर्वीच्या घटना लक्षात घेऊन याभागात तातडीने कायमस्वरूपी वडाळा-पाथर्डी रस्ता अनधिकृत भाजीबाजाराच्या विळख्यातून मुक्त करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vegetable market on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.