कांद्यासोबत भाजीपाल्याचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 08:45 PM2020-01-06T20:45:04+5:302020-01-06T20:45:28+5:30
सायखेडा : बारा हजार रु पयांवर पोहचलेल्या कांद्याच्या विक्र मी भाव कोसळू लागले आहेत. थोड्या दिवसात बाजारभाव ४ हजार रु पये इतके कमी झाल्याने एकरी अवघे दहा क्विंटल निघणाऱ्या कांद्याचा खर्च देखील वसूल होत नाही, तर कांद्या सोबत भाजीपाल्याचे दर खुप कमी झाले आह.
सायखेडा : बारा हजार रु पयांवर पोहचलेल्या कांद्याच्या विक्र मी भाव कोसळू लागले आहेत. थोड्या दिवसात बाजारभाव ४ हजार रु पये इतके कमी झाल्याने एकरी अवघे दहा क्विंटल निघणाऱ्या कांद्याचा खर्च देखील वसूल होत नाही, तर कांद्या सोबत भाजीपाल्याचे दर खुप कमी झाले आह.
शेपू, कोथंबीर, मेथी, पालक यांना आठवडे बाजारामध्ये कोणी विचारत नाही, तर बाजार समितीत नेण्यासाठी येणारा खर्च भरून निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
कांद्याच्या रोपांच्या हंगामात जोरदार अवकाळी पाऊस झाला होता, तर त्यानंतर टाकलेल्या बियाणं आणि रोपांवर धुके पडले त्यामुळे रोपे खराब झाली आणि ज्या रोपत एक एकर क्षेत्रावर कांदा लागवड झाली असती त्या रोपात अवघे पाच गुंठे कांदा लागवड झाली.
त्यानंतर जोरदार पाऊस झाला कधी ढगाळ वातावरण तर कधी धुके यामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला पर्यायाने उत्पादनात घट झाली. बाजार समितीत आवक आली नाही. त्यामुळे चार दिवस कांद्याला चांगला भाव मिळाला, आणि शहरी भागातील नागरिकांनी कांद्याचे भाव गगनाला भिडले असा उहापोह केला.
शासनाने अनेक निर्बन्ध लादले, कांद्याची साठविणूक करू नये, आलेला कांदा तात्काळ उचलावा असा आदेश दिला, त्यामुळे चार पैसे शेतकऱ्यांना मिळण्याचे दिवस आले आणि भावं मात्र ढासळले. बारा हजार रु पये विकणारा कांदा अवघा चार हजार रु पये विकला जात आहे. मात्र कांदा पिकविण्यासाठी येणारा खर्च आणि होणारे उत्पादन यांचा कोणतीही ताळमेळ बसत नाही
यंदा पाऊस चांगला पडला त्यामुळे सर्व शेती ओलिताखाली आली, विहिरींना भरपूर पाणी आहे, ओढा, ओहळ अजून वाहत आहे. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि फळभाज्यांची लागवड केली आह. अनुकूल हवामानामुळे भाज्या जोमाने वाढल्या आहेत. कांद्याची रोपे नसल्याने शेतात कमी कालावधीत येणारे भाजीपल्याचे पीक घेतले आवक वाढली आणि भाजीपाल्यांचे दर कोसळले आज भाजी कवडीमोल भावात विक्र ी करावी लागत आहे.
अनेक शेतकºयांनी शेतात भाजी पडू दिली आहे, खर्च वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी हवालिदल झाले आहे पाऊस चांगला पडला त्यामुळे यंदा चांगले उत्पादन निघेल अशी आशा अखेर भोळी आशा ठरत आहे.
बाजार भाव
मेथी : १ ते ३ रुपये जुडी
कोथंबीर : १ ते २ रुनये, जुडी
शेप ू:1 ते 4 रु जुडी
पालक:1ते 2 रु जुडी
टमाटे :20ते 60 रु कॅरेट 20 किलो
कोबी:2 रु गड्डा
फ्लॉवर:3 रु गड्डा
पंधरा ते वीस दिवसांपासून भाजीपाल्याचे दर कोसळले आहे मेथी ,शेपू, कोथंबीर, पालक अवघा एक रु पया जुडीने विकत आहे त्यासाठी किमान दहा रु पये खर्च येतो आण िआज सोडून द्यावा लागत आहे खूप वाईट दिवस शेतकर्यांवर आले आहे
- युवराज कोटकर, शेतकरी, करंजगाव.