नाशिकमध्ये पालेभाज्यांचे भाव तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:08 PM2018-07-03T12:08:19+5:302018-07-03T12:08:37+5:30
नाशिक/ पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांचे दर तेजीत असून, लिलावात कांदापात, मेथी, शेपू तसेच कोथिंबीर या पालेभाज्या मालाला चांगला बाजारभाव मिळाला. कांदापात मालाची आवक कमी आल्याने बाजारभाव तेजीत आल्याने प्रति जोडीला ४७ रु पये, असा दर मिळाला.
सध्या पावसाळा सुरू झाला झाला असला तरी पावसाने हजेरी लावलेली नाही परिणामी शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत आहे त्यातच गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली यामुळे शेतातील कांदापात पीक धोक्यात आल्याने काहीशी घटली आहे. शनिवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदापात मालाची अत्यंत कमी प्रमाणात आवक आल्याने बाजारभाव तेजीत आले प्रति जुडी ४७ रु पये दराने शेतकºयांना बाजारभाव मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. कांदापात पाठोपाठ मेथी ३५ रु पये जुडी कोथिंबीर ३२ रु पये, तर शेपू १४ रु पये प्रति जुडी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया शेतमालाचे दर असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.