जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:01 PM2020-07-21T21:01:29+5:302020-07-22T01:04:32+5:30
मालेगाव : तालुक्यासह कसमादे परिसरात काही भागात झालेला जोरदार पाऊस आणि काही भागात असलेल्या रोगट हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. बाजारात मागणी तसा पुरवठा होत नसल्याने कांदा, पत्ता कोबी वगळता इतर भाजीपाल्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत.
मालेगाव : (शफीक शेख) तालुक्यासह कसमादे परिसरात काही भागात झालेला जोरदार पाऊस आणि काही भागात असलेल्या रोगट हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. बाजारात मागणी तसा पुरवठा होत नसल्याने कांदा, पत्ता कोबी वगळता इतर भाजीपाल्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत.
कसमादे परिसरात यंदा जूनच्या दुसऱ्या सप्ताहात चांगला पाऊस झाल्याने झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसह भाजीपाल्याचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. गेल्या काही दिवसांपासून रोगट हवामान तसेच काही भागात वारंवार होणाºया पावसामुळे भाजीपाल्याची वाढ खुंटून पिवळा पडला. त्यामुळे आधीच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दर ३५ ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या बाजारात टोमॅटो आणि बटाटे यांचा मोठा तुटवडा आहे. टोमॅटा आणि बटाटे यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. टोमॅटो ३५ ते ४० रुपये तर शिमला मिरची ४५ ते ५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. आडत व्यापाºयांना भाजीपाला लिलावातून कमिशन मात्र चांगले मिळत आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाही बसला आहे.
शिमला मिरचीला सफरचंदाचा भाव
लॉकडाऊन नंतर भाजी बाजारात सोशल डिस्टनस् ठेवून ग्राहकांची गर्दी होत असून शिमला मिरचीला सफरचंदाचा भाव आला आहे. साधारणपणे ३० रुपये पर्यंत असणारे शिमला मिरचीच्या दरात ४० टक्के पर्यंत वाढ झाल्याचे बाजारात पहायला मिळाले.
तरीही कांद्याला कुणी विचारेना
गेल्या दोेन महिन्यापूर्वी कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. सुमारे १५ ते २० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता दहा रुपये किलो दराने मिळू लागला आहे. त्यामुळे आता कांद्याला कुणी विचारत नसल्याचे दिसून आले. कांद्याची पूर्वी आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. काही भागात झालेल्या अतिपावसामुळे साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकºयांनी बााजारात आणल्याने आवक वाढली .
लसूणही ठरतोेय वरचढ
गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुमारे ८० ते ९० रयपये किलो दराने विकला जाणारा लसूण आता तब्बल दुप्पट दराने मिळू लागला आहे. त्यामुळे बाजारात इतर भाज्यांच्या तुलनेतल लसूण वरचढ ठरत असून १४० ते १६० रुपये किलो दरान मिळत आहे.
वांग्याच्या भावातही वाढ
गेल्या दोन महिन्यांपूर्वी केवळ १० ते २० रुपये किलो दराने मिळणारी वांगी आता दुप्पट दराने मिळू लागली आहेत. शहरातील भाजीबाजारात आज वांगी सुमारे ३० ते ४० रुपये किलो दराने मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना भाजीपाला खरेदी करताना आथिर्क फटका बसत आहे. गावरानी वांगी मोठ्या प्रमाणात विकायलायेत आहेत.
कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे शहरात कळवण, सटाणा, देवळा आणि कळवण प्रिसरातून येणारा भाजीपाला काही प्रमाणात येणे कमी झाले होते. त्यामुळष भाजीपाल्याच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. आता काही भाज्यांचे दर कमी झाले आहेत. - संजीव त्रिमुखे, भाजीविक्रेता,मालेगाव कॅम्प
मालेगावात राज्यातील बाहेरून येणाºया येणाºया फळांची कोरोनामुळे आवक कमी झाली. फळ व्यापाºयांनी साठवून ठेवलेला माल बाजारात काढता आला नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. आताा साठवणूक केलेला माल संपला आहे. यामुळे फळांचे भाव वाढले आहेत. - दिनेश श्रीखंडे , ग्राहक