भाजीमंडईची दुरवस्था कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 09:59 PM2019-10-13T21:59:46+5:302019-10-14T00:24:28+5:30
अनेक महापौर बदलले, आयुक्त बदलले, मात्र त्यांच्या कडूनदेखील भाजीमंडईकडे दुर्लक्ष झाल्याने मुंढे गेले, गमे आले तरी सुद्धा भाजीमंडईची दुरवस्था कायम असल्याचे बोलले जात आहे.
पंचवटी : अनेक महापौर बदलले, आयुक्त बदलले, काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे दाखल झाले होते. कालांतराने मुंढे यांची बदली झाली त्यांच्या जागी महापालिका आयुक्त म्हणून राधाकृष्ण गमे आले मात्र त्यांच्या कडूनदेखील भाजीमंडईकडे दुर्लक्ष झाल्याने मुंढे गेले, गमे आले तरी सुद्धा भाजीमंडईची दुरवस्था कायम असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालिका प्रशासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या भाजीमंडईकडे दुर्लक्ष केल्याने सध्या अनेक बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेतला आहे.
काही महिन्यांपूर्वी महापालिकेत दाखल झालेल्या मुंढे यांनी सदर भाजीमंडई स्वच्छ करण्याबाबत प्रशासनाला सूचना करून भाजीविक्रेत्यांना भाजीमंडईत स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
मुंढे शिस्तप्रिय असल्याने भाजीविक्रेते भाजीमंडईत दाखल होतील अशी शक्यता वर्तविली जात होती, मात्र लोकप्रतिनिधी व मुंढे यांच्यात खटके उडाल्याने पालिका आयुक्त विरु द्ध लोकप्रतिनिधी अशी संपली होती. अनेक कारणांवरून वादात सापडलेल्या मुंढे यांची अखेर बदली झाली. त्यानंतर गमे यांनी पदभार स्वीकारला त्यामुळे भाजीमंडई विक्रेत्यांसाठी खुली होईल अशी शक्यता होती, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने कोट्यवधी रुपयांची भाजीमंडई धूळ खात पडून आहे. त्यामुळे अनेक बेघर नागरिकांनी ताबा घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजीबाजार भरण्याऐवजी अतिक्रमण झाल्याने कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. तसेच भिकारी आणि बेघरांनी ताबा घेतल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रात्रीच्या वेळी मद्यपी आणि जुगारींचा अड्डा या ठिकाणी जमतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून कारवाई मागणी केली आहे.
इमारत पडली ओस
गंगाघाटावरील भाजीविक्रे त्यांना भाजीपाला विक्र ीसाठी गणेशवाडी आयुर्वेद रु ग्णालयासमोर महापालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रु पयांचा खर्च करून भाजीमंडई इमारत उभारली होती. मात्र अगदी सुरु वातीपासूनच वादात सापडलेल्या भाजीमंडईत
विक्रे त्यांनी स्थलांतर होण्यास नकार दिल्याने भाजीमंडई इमारत आजही ओस पडून आहे.