भाजीपाला व्यापाऱ्यावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

By admin | Published: May 27, 2017 11:19 PM2017-05-27T23:19:47+5:302017-05-27T23:19:47+5:30

दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असलेल्या व्यापाऱ्याच्या भावावर टोळक्याने प्राणघातक हल्ला

Vegetable stripe strikes the businessman | भाजीपाला व्यापाऱ्यावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

भाजीपाला व्यापाऱ्यावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असलेल्या व्यापाऱ्याच्या भावावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची शनिवारी (दि़२७) रोजी रात्रीच्या सुमारास घडली़ अजय विजय निकम (२५, अवधुतवाडी, दिंडोरी रोड, पंचवटी नाशिक) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यापाऱ्याच्या भावाने नाव असून पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केट यार्डात सुदीप निकम यांचा भाजीपाल विक्रीचा व्यवसाय आहे़ शनिवारी सायकाळी त्यांना अचानक काम निघाल्यामुळे त्यांनी लहान भाऊ अजय यास मार्केट यार्डमध्ये पाठविले़ मात्र नेहेमीची माणसे कामावर न आल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी अजय दुचाकीवरून वज्रेश्वरी झोपडपट्टीजवळील शाहू नगरमध्ये गेला़ मात्र कामावरील माणसे न भेटल्यामुळे परतत असताना चार-पाच जणांच्या टोळक्याने त्यास अडवून पैशांची मागणी केली़
अजयने या टोळक्यास पैसे कसले द्यायचे अशी विचारणा केली असता यातील काहींनी चॉपरने त्याच्यावर वार केले़ अजयने यातील काही वार चुकविण्याचा प्रयत्न केला असता टोळक्यातील काहींनी त्यास पकडून ठेवले तर त्यातील एकाने डोक्यावर कोयत्याने वार केला़ यामध्ये गंभीर जखमी झालेला अजय जीव वाचवून पोलीस ठाण्यात पोहोचला़ यांनतर त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत़
या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित प्रविण लोखंडे यास ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ दरम्यान, संशयितांवर जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अ‍ॅड़सुदीप निकम यांनी केली आहे़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़

Web Title: Vegetable stripe strikes the businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.