संतप्त शेतकऱ्यांनी फेकला रस्त्यावर भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:14 AM2018-11-29T01:14:54+5:302018-11-29T01:15:18+5:30
माथाडी कामगारांचा संप सुरू असल्याने मुंबई येथील वाशी मार्केट बंद ठेवण्यात आले असतानाही व्यापाºयांनी त्याची माहिती शेतकºयांना दिली नाही, परिणामी जिल्ह्यातील शेतकºयांनी नेहमीप्रमाणे त्यांचा भाजीपाला वाशी मार्केटला नेला व तेथून माघारी परतावे लागल्याने संतप्त शेतकºयांनी बुधवारी मुंबई-महामार्गावरील गरवारे पॉइंट येथे रस्त्यावर भाजीपाला फेकून रास्ता रोको आंदोलन केले.
नाशिक : माथाडी कामगारांचा संप सुरू असल्याने मुंबई येथील वाशी मार्केट बंद ठेवण्यात आले असतानाही व्यापाºयांनी त्याची माहिती शेतकºयांना दिली नाही, परिणामी जिल्ह्यातील शेतकºयांनी नेहमीप्रमाणे त्यांचा भाजीपाला वाशी मार्केटला नेला व तेथून माघारी परतावे लागल्याने संतप्त शेतकºयांनी बुधवारी मुंबई-महामार्गावरील गरवारे पॉइंट येथे रस्त्यावर भाजीपाला फेकून रास्ता रोको आंदोलन केले. अंबड पोलिसांनी रास्ता रोको करणाºया शेतकºयांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. माथाडी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून संप पुकारलेला आहे. या संपाबाबतची माहिती शेतकºयांना नसल्याने शेतकºयांनी त्यांच्या शेतातील कोबी, फ्लॉवर, वांगे, वाल आदींसह शेतातील भाजीपाला काढला होता. नेहमीप्रमाणे शेतकरी हे त्यांचा माल वाशी मार्केमध्ये घेऊन गेले असता वाशी मार्केट बंद असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती नाशिक शहर व तालुक्यातील शेतकºयांना समजेपर्यंत त्यांनी त्यांच्या शेतातील माल काढला होता.
माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे त्र्यंबकेश्वर येथील गणेशगाव शिवनगाव, गणेशगाव (नाशिक), ओझरखेड, राजेवाडी, पिंपळगाव, गंगाम्हाळुंगे, देवरगाव, शेरपाड, रोहली आदींसह परिसरातील तालुक्यांमधील शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
जोरदार घोषणाबाजी
व्यापाºयांनी संपाबाबतची माहिती दिली नसल्याने शेतकºयांनी व्यापाºयांवर नाराजी व्यक्त करीत बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गरवारे पॉइंट येथे त्यांच्याकडील भाजीपाला रस्त्यावर फेकत रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकºयांनी शासन तसेच व्यापा-यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नुकसानभरपाईची मागणी केली.