स्कूल बसमधून विकला जातोय भाजीपाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:07+5:302021-07-14T04:17:07+5:30
सोयगाव : वाढत्या काेराेना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून शाळा बंद असून, ऑनलाईन क्लासेस ...
सोयगाव : वाढत्या काेराेना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून शाळा बंद असून, ऑनलाईन क्लासेस सुरू होते. त्यामुळे एक वर्षाहून अधिक काळ शालेय बस नुसत्याच उभ्या आहेत. या बसचे मालक, चालक, क्लिनर, महिला सहाय्यक असे सर्वच आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
मालेगाव शहरात १०० शालेय बस आणि ७० शालेय व्हॅन व शंभरहून अधिक रिक्षा आहेत. कोरोनामुळे बसमालक आर्थिक संकटात सापडले आहेत. गाडीसाठी ज्या बँकांकडून कर्ज घेतले आहे त्यांच्याकडून त्रास दिला जात आहे. गाड्या उभ्या आहेत, एका रुपयाचीही कमाई नाही. मात्र, कर आणि विमा तर भरावा लागतो ना, ताे कसा भरायचा, हा प्रश्न आहे. बसचालक, क्लिनर आणि महिला सहाय्यक यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच राज्यात सात जणांनी आत्महत्यादेखील केली आहे. कोरोनामुळे बसचालकांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांच्याकडे आठ ते दहा गाड्या आहेत. पण त्या उभ्या आहेत. बसचालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरे पर्याय शोधावे लागत आहेत. काही बसमालक गाड्या धुणे, भाजीपाला विकणे, एखाद्या गाडीवर चालक म्हणून काम करणे आदी कामे करत आहेत.
कोरोनाच्या काळात सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना मदतीसाठी विनंती केली होती. मात्र, केवळ आश्वासने मिळाली. एकीकडे केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत योजना राबवत आहे. पण, आता शालेय बसमालकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. काेराेनामुळे मालेगाव शहरात शाळा बंद आहेत. साहजिकच शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या बसचालकांच्या बसची चाके थांबली आहेत. ही चाके थांबल्याने त्यांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. बस चालकांसह, मालकांची स्थिती बिकट झाली आहे. उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. स्कूल बसमालक, चालक, क्लिनर, सहाय्यक यांचे दीड ते दोन वर्षांत प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाने स्कूल बसचालक - मालक यांच्या बाबतीतही धोरणात्मक निर्णय जाहीर करावा आणि हातभार लावावा.
मालकांचे कोट...
दोन वर्षांपासून स्कूल बस बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. बँकेचे हप्ते फेडणे अवघड झाले आहे. प्रायव्हेट फायनान्स हप्ते न भरल्यास भरमसाठ दंड आकारत आहेत. हॉटेलमध्ये काम करून गाडीचे हप्ते भरत आहे.
- प्रकाश देवरे, बस मालक
सगळे जगणेच अवघड झाले आहे. शासन मदत करत नाही आणि बँकांचे हप्ते जगू देत नाहीत. मजुरी आणि शेतीकाम करून गाडीचे हप्ते फेडत आहे.
- तुषार शेवाळे, बसमालक
चालकांचे कोट...
अतिशय वाईट परिस्थिती आहे. उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. इतर मालवाहतूक गाडीस बदली चालक म्हणून काम मिळाले तर वाहन चालवतो, न मिळाल्यास रोजंदारीचे काम करावे लागत आहे.
- भाऊसाहेब सोनवणे, बसचालक
संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह बसवर अवलंबून आहे. घर कसे चालवायचे व गाडीचे हप्ते कसे फेडायचे, हा यक्ष प्रश्न झोप लागू देत नाही. मिळेल ते शेतीकाम व मजुरी करून कसातरी उदरनिर्वाह चालू आहे. हप्ता न भरल्यास बँक चक्रीवाढ व्याज लावते.
- शांताराम देवरे, चालक-मालक
मालेगाव शहरात एकूण २०६ शाळा
: १०० बसेस
७० व्हॅन
शंभरांहून अधिक रिक्षा
फोटो - १३ व्हॅन १
गाडी घरीच पडून आहे. दोन वर्षांपासून गाडी बंद असल्याने टायर कामातून जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचा वापर नाही. इतर भाडेही मिळत नाही.
फोटो - १३व्हॅन २
शेतात पडून आहे. शेतीचे सामान ठेवण्यासाठी, भाजीपाला वाहून नेण्यासाठी वापर, लग्न भाडे मिळाले तर वापर होतो. पण तेही यावर्षी नाही.
फोटो - १३व्हॅन ३
गाडी भाजीपाला वाहून नेण्यासाठी, शेतीच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी वापरात आहे.
130721\13nsk_19_13072021_13.jpg~130721\13nsk_20_13072021_13.jpg~130721\13nsk_21_13072021_13.jpg
गाडी घरीच पडून आहे. दोन वर्षांपासून गाडी बंद असल्याने टायर कामातून जाण्याची शक्यता आहे.कोणत्याही प्रकारचा वापर नाही. इतर भाडेही मिळत नाहीत.~शेतात पडून आहे,शेतीचे समान ठेवण्यासाठी, भाजीपाला वाहून नेण्यासाठी वापर,लग्न भाडे मिळाले तर वापर पण ते ही यावर्षी नाही समान आहे.~गाडी भाजीपाला वाहून नेण्यासाठी, शेतीच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी वापरात आहे.