भाज्या स्वस्त झाल्या, तर डाळी कडाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:18 AM2021-08-23T04:18:04+5:302021-08-23T04:18:04+5:30
चौकट- टोमॅटाे ७.५० रुपये किलो भाजीपाल्याला उठाव कमी असल्याने सर्वच फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर उतरले असून, होलसेल बाजारात टोमॅटाे ...
चौकट-
टोमॅटाे ७.५० रुपये किलो
भाजीपाल्याला उठाव कमी असल्याने सर्वच फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर उतरले असून, होलसेल बाजारात टोमॅटाे ३.५० ते ७.५० रुपये किलो दराने विकले जात आहेत. टोमॅटोचे दर घसरल्यामुळे उत्पादकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
चौकट-
खाद्यतेल स्थिर
मागील काही दिवसांपासून वाढत असलेले खाद्यतेलाचे दर आता स्थिर झाले असून, ऐन सणासुदीच्या दिवसांत डाळीचे दर कडाडले आहेत. जवळपास सर्वच प्रकारच्या डाळींच्या दरात सात रुपयांनी वाढ झाली आहे. मसूर डाळ ८४ रुपयांपासून ९१ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
चौकट-
मोसंबी ४० रुपये किलो
नाशिक बाजार समितीमध्ये साधारणत: १७०० ते १८०० क्विंटल फळांची आवक होत असून, सर्वच फळांना चांगला दर मिळत आहे. मोसंबी १५ ते ४० रुपये, तर सफरचंद ९० ते १५० रुपये किलोने विकले जात आहेत. किरकोळ बाजारात यापेक्षा अधिक दर आहेत.
कोट-
केंद्र शासनाने डाळींवर लावलेले साठ्यांचे निर्बंध शिथिल केल्याने डाळींच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे सध्या किराणा बाजारात तेजीचे वातावरण आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा ड्रायफ्रूटस्वर परिणाम झाला आहे. - अनिल बुब, किराणा व्यापारी
कोट-
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टोमॅटाे पिकाला लहान मुलाप्रमाणे जपावे लागते आणि आज त्यालाच मातीमोल भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होणे महागाचे झाले आहे. - विष्णू पगारे, शेतकरी
कोट-
इतक्या दिवस भाज्या महाग होत्या, आता भाज्या स्वस्त झाल्या, तर डाळी महागल्या आहेत. यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांची काही महागाईच्या तडाख्यातून सुटका होत नाही. रोज काय स्वयंपाक करावा असा प्रश्न निर्माण होतो. - अंजली गायकवाड, गृहिणी