टोल लेनच्या दुरुस्तीसाठी वाहनधारक वेठीस!
By admin | Published: March 7, 2017 11:49 PM2017-03-07T23:49:51+5:302017-03-07T23:50:12+5:30
घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोल नाक्याच्या लेनच्या नूतनीकरणाच्या कामाचा फटका या मार्गावरून मुंबई आणि नाशिककडे जाणाीऱ्या हजारो वाहनधारकांना बसत आहे.
दुतर्फा लागतात वाहनांच्या लांबच लांब रांगा
घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोल नाक्याच्या लेनच्या नूतनीकरणाच्या कामाचा फटका या मार्गावरून मुंबई आणि नाशिककडे जाणाीऱ्या हजारो वाहनधारकांना बसत असून, दुरुस्तीसाठी काही लेन बंद ठेवण्यात येत असल्याने वाहनधारकांना तासन्तास वाहतुकीच्या कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे.
घोटी येथील महामार्गावर गेल्या सहा वर्षांपासून पथकर वसुलीसाठी टोल नाका कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी महामार्ग प्राधिकरणाने टोल वसुलीचे कंत्राट असणाऱ्या कंपनीत बदल केला असून, नवीन कंपनीला टोल वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे.
दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार टोल नाक्याच्या सर्व लेनवर अवजड वाहनांचे वजन करण्यासाठी वजन काटा लावणे बंधनकारक केले आहे. यानुसार येथील टोल नाक्यावर वजनकाटा लावण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र महिन्याभरापासून हे काम संथ गतीने चालू आहे. यासाठी काही टोल लेन बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे.
टोल नाक्यावर वाहतुकीची कोंडी नित्याची बाब झाली आहे. हे नूतनीकरणाचे काम जलद गतीने करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. (वार्ताहर)