येवला शहरात वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 11:20 PM2021-09-13T23:20:47+5:302021-09-13T23:21:14+5:30
येवला : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांचे नेतृत्वाखाली शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे.
ठळक मुद्दे वाहनचालकांकडून ४ हजार २०० रुपयांचा दंडही वसूल
येवला : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांचे नेतृत्वाखाली शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे.
या मोहिमेत २१ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विना कागदपत्र असलेली वाहने, विना नंबर प्लेट, वाहतुकीचे नियम न पाळणे या कारणावरून २१ वाहनचालकांवर शहर पोलिसांतर्फे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबरोबरच काही वाहनचालकांकडून ४ हजार २०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.