सम-विषम पार्किंगमधूनही वाहनांचे ‘लिफ्टिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 01:23 AM2018-06-11T01:23:40+5:302018-06-11T01:23:40+5:30
नाशिक : रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांना टोइंग करून वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याच्या प्रकारामुळे वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात; परंतु पोलीस जेव्हा सम-विषय पार्किंगमधूनही वाहने उचलून नेतात तेव्हा अधिकृत पार्किंगही अनधिकृत कशी ठरू शकते, असा सवाल संतप्त वाहनचालकांकडून विचारला जात आहे.नाशिक : रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांना टोइंग करून वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याच्या प्रकारामुळे वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात; परंतु पोलीस जेव्हा सम-विषय पार्किंगमधूनही वाहने उचलून नेतात तेव्हा अधिकृत पार्किंगही अनधिकृत कशी ठरू शकते, असा सवाल संतप्त वाहनचालकांकडून विचारला जात आहे.
नाशिक : रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांना टोइंग करून वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याच्या प्रकारामुळे वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात; परंतु पोलीस जेव्हा सम-विषय पार्किंगमधूनही वाहने उचलून नेतात तेव्हा अधिकृत पार्किंगही अनधिकृत कशी ठरू शकते, असा सवाल संतप्त वाहनचालकांकडून विचारला जात आहे.
शरणपूररोडवरील पंडित कॉलनीत रविवारी दुपारी एका सम तारखेच्या फलकाजवळ चारचाकी वाहन उभे होते. वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅनमधील अतिउत्साही तरुणांनी लागलीच टोइंग व्हॅनवरून उड्या घेत कारला घेराव घातला आणि कारवाईला सुरुवात केली. इतक्यात कारचालक तेथे आला आणि त्याने समतारखेचा बोर्ड असल्याने पार्किंग केल्याचे वाहतूक पोलिसाच्या निदर्शनास आणून दिले. या पोलीस महाशयांनी लागलीच हे फलक कालबाह्य असल्याचे सांगून फलकावर पांढºया खडूने ‘फुली’ मारण्याचे फर्मान कर्मचाºयांना सोडले. कर्मचाºयांनीही फलकावर फुली मारली आणि कार पार्किंग केल्याबद्दल त्या चालकाकडून दंड वसूल करून टोइंग वाहन निघून गेले.
नो पार्किंगमधील वाहन उचलून नेण्याच्या आणि चालकाशी हुज्जत घालण्याच्या प्रकारावरून
टोइंग वाहनावरील कर्मचारी आणि वाहतूक पोलीस कर्मचाºयांच्या उर्मट वर्तनाविषयी अनेक प्रकार समोर आलेले आहेत; मात्र टोइंग वाहनावरील कर्मचारी आणि पोलिसांच्या वर्तनात कोणताही फरक पडलेला दिसत नसल्याने चालकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची चर्चा बघ्यांमध्ये सुरू होती.
दंड वसूल करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याच्या पोलिसांच्या या भूमिकेमुळे इतर नागरिकांनीदेखील अनेक तक्रारी केल्या. पोलिसांकडून आणि गाडीवरील कर्मचाºयांकडून वाहनचालकांना उद्धटपणाची वागणूक मिळत असल्याने पोलिसांनी दादागिरी वाढल्याच्या भावना अनेकांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केल्या.
मग पार्किंग करावे कुठे ?
नो-पार्किंग झोनमधील वाहने उचलण्यात येत असली तरी आता सम-विषम पार्किंगमध्ये उभी असलेली वाहनेदेखील उचलली जात असल्याने आणि सदर फलके ही जुनी असून, शहरात अशी पार्किंगच नसल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याने वाहने नेमकी कुठे उभी करावी, असा प्रश्न वाहनधारकांकडून विचारला जात आहे.