रेडियम रिफ्लेक्टरच्या नियमांनी वाहनमालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:11 AM2021-06-26T04:11:53+5:302021-06-26T04:11:53+5:30

यासंदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले, त्यात म्हटले आहे की, रेडियम रिफ्लेक्टरबाबत परिवहन आयुक्तांनी परिपत्रक ...

Vehicle owners plagued by radium reflector regulations | रेडियम रिफ्लेक्टरच्या नियमांनी वाहनमालक त्रस्त

रेडियम रिफ्लेक्टरच्या नियमांनी वाहनमालक त्रस्त

Next

यासंदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले, त्यात म्हटले आहे की, रेडियम रिफ्लेक्टरबाबत परिवहन आयुक्तांनी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार नवीन रेडियम रिफ्लेक्टर बसविण्याबाबत नेमलेल्या कंपन्यांकडून होत असलेल्या वाढीव दराबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार आरटीओ विभागात रेडियम रिफ्लेक्टरच्या दरांचे फलक लावण्यात यावे. तसेच पूर्वी बसविण्यात आलेले टेप व रिफ्लेक्टर सुस्थितीत असूनही नवीन बसविण्याची सक्ती करण्यात येते ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. याबाबत आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात. रेडियम रिफ्लेक्टर सुस्थितीत असेल तर नवीन लावण्यास बंधनकारक करण्यात येऊ नये. तसेच याबाबत लागणारे मूळ प्रमाणपत्र रेडियम रिफ्लेक्टर लावताना आरटीओ विभागात जमा केले जात असल्याने वाहनचालकांना त्याची सक्ती करू नये, अशी मागणी केली आहे. या वेळी राजेंद्र फड, सुभास जांगडा, मानिक मेमाने, सदाशिव पवार, शंकर धनावडे, गजानन सोसे, तिवारी आदी उपस्थित होते.

Web Title: Vehicle owners plagued by radium reflector regulations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.