वेग नियंत्रक बसवून वाहने नोंदणीस आणावीत
By admin | Published: January 16, 2016 11:05 PM2016-01-16T23:05:09+5:302016-01-16T23:09:01+5:30
वेग नियंत्रक बसवून वाहने नोंदणीस आणावीत
’मालेगाव : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन संवर्गात नोंदणीसाठी येणाऱ्या वाहनांना उत्पादकाने किंवा वाहन वितरकाने वेग नियंत्रक बसवून वाहने नोंदणीसाठी हजर करावीत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुधाकर मोरे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
मोरे यांनी म्हटले आहे की, केंद्रीय मोटार वाहन कलम १९८९ मधील नियम ११८च्या पोटनियम (१) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ज्या वाहतूक वाहनांची १ आॅक्टोबर २०१५ पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना वेग नियंत्रक बसविलेले नाही आणि जी वाहने या नियमामध्ये अंतर्भूत होत नाही, अशा वाहनांना १ एप्रिल २०१६ रोजी किंवा त्यापूर्वी वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार मानक एआयएस ०१८/२००१ नुसार पुढीलप्रमाणे कमाल पूर्वनिर्धारित वेग मर्यादेचा वेग नियंत्रक बसविला जाईल, असे महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेनुसार कळविले आहे.
केंद्र सरकारच्या १-१०-२०१५ रोजीच्या अधिसूचना एन-१, एम-२ संवर्गात नोंद झालेल्या वाहनांना वेग नियंत्रक बसविण्यापासून सूट दिली आहे. सर्व स्कूल बस (४० किमी), घातक वस्तू वाहून नेणारी परिवहन संवर्गातील वाहने (६० किमी), डंपर्स व ट्रॅक्टर्स (६० किमी) उपरोक्त नमूद नसलेली परिवहन संवर्गातील वाहने (८० किमी) अशी प्रतितास वेग
मर्यादा ठरविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)