मंदिर परिसराला वाहनांचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:40 AM2020-12-17T04:40:51+5:302020-12-17T04:40:51+5:30
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले येथील त्र्यंबकराजाचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असले तरी मंदिरात प्रवेश करताना प्रवेशाचे ...
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले येथील त्र्यंबकराजाचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असले तरी मंदिरात प्रवेश करताना प्रवेशाचे नियोजन, बाहेर मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे. मंदिर परिसराला वाहनांचा वेढा पडत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
प्रारंभी मंदिरात भाविकांची गर्दी कमी होती; मात्र दिवसेंदिवस गर्दी वाढत असून, भाविक एकमेकांना खेटुन गर्दी करून मंदिरात प्रवेश करतात. कोविड -१९ चे बहुतेक निर्बंध उठवण्यात आले असून, फिजिकल डिस्टन्सिंग व मास्क मात्र बंधनकारक आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवस्थान ट्रस्टतर्फे खबरदारी घेतली जात आहे. इन्फ्रारेड थर्मामीटरने शरिरातील तापमान तपासले जात आहे. सॅनिटायझेशन करूनच मंदिरात सोडले जाते. आणि गर्भगृहासमोरुन फक्त हात जोडून दर्शन घेरून बाहेर पडावे लागते. यात कुठलेही उल्लंघन होत नाही. अर्थात देवस्थान प्रशासन पूर्ण काळजी घेत असले तरी रस्त्यावरून बाहेर
पडणाऱ्यांचा प्रश्न निर्माण होत आहे. काही लोक तर तोंडावर मास्कदेखील घेत नाहीत. काही जण मास्क अडकवितात; पण मास्क मात्र गळ्यात असतो. मास्कने तोंड व नाक डोळ्याच्या खालपर्यंत घेतलेला असावा, पण येथे तर कोणीच काळजी घेत नाही. वास्तविक याबाबतची खबरदारी नगर परिषद व पोलीस प्रशासनाने घ्यावयास हवी. नगर परिषदेने मास्क न घातल्यास दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहेे.-----------
अर्थकारण रूळावर
मंदिरे उघडल्यापासून त्र्यंबकेश्वर शहराचे अर्थकारण रुळावर आले आहे. धार्मिक विधी पुरोहित गाइडपासून ते रिक्षावाले, हाॅकर्स गायींना चारा विकणाऱ्या महिला फळफुले, प्रसादी वाण भेट वस्तु घरात ठेवण्यासाठी वस्तु हाॅटेल लाॅजिंगवाले आदी सर्वांचे अर्थचक्र सुधारले असल्याचे चित्र दिसून येत आहे. सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात बॅरिकेडींग केलेली आहे; पण सध्याचे चित्र पाहता काही चारचाकी वाहने अर्थात कार थेट त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर उभ्या राहून त्यातील प्रवासी उतरतात, तर दुचाकीवर आलेल्या प्रवाश्यांमुळे थेट मंदिरासमोर जणू अघोषित वाहनतळ उभारण्यात आले आहे. भाविकांची गर्दी, वाहनतळ यामुळे मंदिरासमोर गर्दीच गर्दी दिसून येते. बाहेरची वाहने थेट त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर उभी राहतात. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवनेरी बिल्डींगमध्ये जागा, जमिनीचे, शेतीचे, घरांचे व्यवहार सहायक उपनिबंधक कार्यालयात केले जातात. यावेळी खरेदी-विक्री करणारे आदींची वाहने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पार्क केली जातात. ही वाहने व व्यवहार करण्यासाठी आलेली वाहने यामुळे मंदिर परिसर खासगी दुचाकी, चारचाकी यांनी व्यापून टाकला आहे. (१६ टीबीके १)
===Photopath===
161220\16nsk_6_16122020_13.jpg
===Caption===
(१६ टीबीके १)