गाड्यांची तोडफोट; घटना सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:16 AM2021-05-18T04:16:34+5:302021-05-18T04:16:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिडको : येथील सुंदरबन कॉलनीत रविवारी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालत परिसरात दहशत पसरवत नागरिकांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : येथील सुंदरबन कॉलनीत रविवारी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालत परिसरात दहशत पसरवत नागरिकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या संशयित मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यात अद्यापही अंबड पोलिसांना यश आलेले नाही. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे..
रविवारी (दि.१६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास सिडको लेखानगर येथील सुंदरबन कॉलनी परिसरात चार ते पाच समाजकंटकांनी घरासमोर लावण्यात आलेल्या सहा ते सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोड करणाऱ्या टोळक्याचा शोध सुरू केला आहे. यातील मुख्य सूत्रधाराने काही महिन्यांपूर्वीदेखील याच परिसरात दहशत पसरविण्याचा प्रकार केला आहे. यानंतर पोलिसांनी त्यास अटकदेखील केली होती. सदरचा गुन्हेगार हा महिनाभर तडीपार होता. त्याची ताडीपारी नुकतीच पूर्ण झाली असून, पुन्हा त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
---कोट---
परिसरात दहशत पसरवित चारचाकी गाड्यांची ताेडफोड करणाऱ्यांचे धागेदोरे हाती लागले आहेत. कोरोनाकाळात शांतता राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. मात्र कोणीही गैरप्रकार अथवा गुंडगिरी करून शांतता भंग करीत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
कुमार चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड
(फोटो - लेखानगर येथील कार तोडफोडप्रकरणी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.)
===Photopath===
170521\17nsk_50_17052021_13.jpg
===Caption===
लेखानगर येथील कार तोडफोड प्रकरणी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.