शहरातही वाहने सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:11 AM2021-07-23T04:11:26+5:302021-07-23T04:11:26+5:30
---- ऑलिम्पिकवीरांना शुभेच्छा नाशिक : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटनासह भारतीय ऑलिम्पिकवीरांना शुभेच्छा आणि जिल्हानिर्मितीस १५१ वर्षपूर्तीनिमित्त कर्मवीर काकासाहेब वाघ ...
----
ऑलिम्पिकवीरांना शुभेच्छा
नाशिक : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटनासह भारतीय ऑलिम्पिकवीरांना शुभेच्छा आणि जिल्हानिर्मितीस १५१ वर्षपूर्तीनिमित्त कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात वृक्षाराेपण करण्यात आले. माजी ऑलिम्पियन कविता राऊत आणि दत्तू भोकनळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
----------
गोदाकाठच्या विक्रेत्यांची धावपळ
नाशिक : दिवसभर पाऊस पडल्याने गोदाकाठच्या आसपास बसणाऱ्या विक्रेत्यांची सकाळपासून धावपळ उडाली. आपापल्या दुकानातील सामान गोळा करून गोदाकाठावर येणाऱ्या पुराच्या पाण्यापासून लवकरात लवकर लांब जाण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ उडाली होती.
-----
वाहने उचलल्याने नागरिक त्रस्त
नाशिक : शहरात नो पार्किंग परिसरातून वाहने उचलली जाऊ लागल्याने नागरिक परेशान झाले आहेत. नुकतीच कामधंद्याला सुरुवात होऊ लागलेली असताना काम बाजूला राहून गाडी उचलली जात असल्याने त्यामागे धावावे लागत असल्याबाबत नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.
---
जांभूळ विक्रेत्यांमध्ये वाढ
नाशिक : शरणपूर रोड परिसरात सध्या जांभूळ विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे रस्त्यावरच थांबून जांभळे खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांनादेखील मोठ्या प्रमाणात अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
----
चाट भांडारचा व्यवसाय थंडच
नाशिक : काही व्यवसाय हे प्रामुख्याने सायंकाळच्या वेळीच गर्दी होणारे असतात. मात्र, व्यावसायांवरील निर्बंधात सूट दिल्याने काही व्यवसाय हळूहळू रुळावर येऊ लागले आहेत. मात्र, सायंकाळी ४ पर्यंतचे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे चाट भांडार हेच ज्यांचे प्रमुख व्यवसाय आहेत, त्यांचे व्यवसाय थंडच पडलेले आहेत.
----