साइटपट्ट्या नसल्याने वाहन थेट नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 10:24 PM2020-08-20T22:24:20+5:302020-08-21T00:33:46+5:30

गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या सुरत - शिर्डी महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून, गटाराचे व साइटपट्टीचे कामदेखील अपूर्ण आहे. त्यामुळे याचा फटका एका वाहनचालकाला बसला.

Vehicles go directly to the nala as there are no site strips | साइटपट्ट्या नसल्याने वाहन थेट नाल्यात

साइटपट्ट्या नसल्याने वाहन थेट नाल्यात

Next

पिंपळगाव बसवंत : गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या सुरत - शिर्डी महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून, गटाराचे व साइटपट्टीचे कामदेखील अपूर्ण आहे. त्यामुळे याचा फटका एका वाहनचालकाला बसला. याबाबत वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त होत आहे व लवकरात लवकर या महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपळगाव बसवंत शहर हे व्यापारी व मोठी बाजारपेठ असलेले गाव असून, शहरात वाहनांची रहदारी जास्त प्रमाणात आहे. दररोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यातच शहरातून जाणाऱ्या शिर्डी सुरत महामार्गाचे कामदेखील सुरू असल्याने वाहनांची मोठी कोंडी निर्माण होत आहे.
त्यामुळे वाहनचालकांचे वाद व छोटे-मोठे अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करून होणाºया अपघातांना आळा घालावा, अशी मागणी वाहनधारकांकडूून होत आहे.

Web Title: Vehicles go directly to the nala as there are no site strips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.