गुजरातला जाणारी वाहने अडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:02 AM2021-04-18T00:02:50+5:302021-04-18T00:02:50+5:30

पंचवटी : नाशिक जिल्ह्यातून शनिवारी सायंकाळी गुजरात राज्यात द्राक्ष तसेच भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यातील पोलिसांनी कोरोना आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्या कारणाने अडवून धरल्याने दोन तासांपासून चालक चेक नाक्यावर थांबूनच आहे विशेष म्हणजे शंभराहून अधिक मालवाहू वाहने संबंधित चेक नाक्यावर थांबून असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

Vehicles going to Gujarat blocked | गुजरातला जाणारी वाहने अडविली

गुजरातला जाणारी वाहने अडविली

Next
ठळक मुद्दे सापुतारा चेक नाका : द्राक्ष, भाजीपाला वाहनांच्या रांगा

पंचवटी : नाशिक जिल्ह्यातून शनिवारी सायंकाळी गुजरात राज्यात द्राक्ष तसेच भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यातील पोलिसांनी कोरोना आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्या कारणाने अडवून धरल्याने दोन तासांपासून चालक चेक नाक्यावर थांबूनच आहे विशेष म्हणजे शंभराहून अधिक मालवाहू वाहने संबंधित चेक नाक्यावर थांबून असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

कोरोना चाचणी आरटीपीसीआर अहवाल आणा मगच वाहने सोडू अशी भूमिका गुजरात पोलिसांनी घेतल्याने गुजरात राज्याकडे शेतमाल तसेच द्राक्ष माल घेऊन जाणाऱ्या शेकडो वाहनचालकांची मोठी अडचण झाली होती. सध्या संपूर्ण देशभर कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत राज्यभरात पंधरा दिवस कडक निर्बंध लागू केले असून यामध्ये मालवाहतूकीला सूट देण्यात आली आहे.
शनिवारी सापुतारा चेक नाक्यावर नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी ओझर पिंपळगाव बसवंत भागातून द्राक्ष व भाजीपाला माल घेऊन जाणारी वाहने दोन तासापासून अडवून ठेवल्याने वाहन चालकांची कोंडी झाली होती सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यात द्राक्ष व भाजीपाला घेऊन जाणारी वाहने अडविल्यानंतर दिंडोरी तालुक्यातील काही नागरिकांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधून वाहने अडविले याबाबत तक्रार केली त्यानंतर झिरवाळ यांनी जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत चेक नाक्यावर थांबविलेल्या गाड्या गुजरातकडे रवाना करण्याच्या बाबतीत तोडगा काढण्याबाबत सूचना केल्या.

Web Title: Vehicles going to Gujarat blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.