सप्तशृंगगडावर वाहनांना बंदी

By admin | Published: August 4, 2016 12:43 AM2016-08-04T00:43:11+5:302016-08-04T00:44:41+5:30

वणी : दरड हटवण्याचे काम अंतिम टप्प्यात; पावसाचा जोर कायम

Vehicles on Saptashringgad banned | सप्तशृंगगडावर वाहनांना बंदी

सप्तशृंगगडावर वाहनांना बंदी

Next

 वणी : सप्तशृंगी देवीच्या गडावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आजही सुरूच असल्याने तसेच गडावर जाणाऱ्या घाटात दरड कोसळल्याने मोठ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. गणपती घाटात मंगळवारी दरड कोसळली होती. यामुळे रस्त्यावर दगडाचे खच पडले होते. प्रशासनाने हा अडथळा दूर करून दुचाकी वाहनांना प्रवेश सुरू ठेवला आहे. मोठी वाहने व बसला गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. खोल दरीकडे जाणारा रस्ता खचल्याने या रस्त्याजवळ बंदोबस्त लावण्यात आला आहे. हा रस्ता दुरुस्तीसाठी आठ ते दहा दिवस लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत मोठ्या
वाहनांसाठी गडावर बंदी घालण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Vehicles on Saptashringgad banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.