वाहनांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:16 AM2019-09-23T00:16:36+5:302019-09-23T00:17:07+5:30
पंचवटी : मोटार वाहन कायद्यानुसार वायूप्रदूषण केंद्रात वाहन तपासणी आॅनलाइन व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करून त्याची नोंद वाहन ४.० संगणकीय ...
पंचवटी : मोटार वाहन कायद्यानुसार वायूप्रदूषण केंद्रात वाहन तपासणी आॅनलाइन व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करून त्याची नोंद वाहन ४.० संगणकीय प्रणालीवर करणे गरजेचे आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
रस्त्यावर वाहन चालविताना वाहनासमवेत आरसीबुक, वाहन चालविण्याचा परवाना, इन्शुरन्स, तसेच वायूप्रदूषण प्रमाणपत्र जवळ बाळगणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यात ५४ अधिकृत वायूप्रदूषण तपासणी केंद्रे आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वायूप्रदूषण तपासणी केंद्राचे कामकाज आॅनलाइन पद्धतीने करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ३४ वायूप्रदूषण तपासणी केंद्रांचे कामकाज आॅनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले आहे, तर उर्वरित २० वायू तपासणी केंद्रांनी तत्काळ आॅनलाइन पद्धतीने करून त्याची नोंद ँ३३स्र:/५ंँंल्ल.स्रं१्र५ंँंल्ल.ॅङ्म५.्रल्ल/स्र४ू यावर अद्ययावत करावी. नोंद करण्यासाठी दि.१ आॅक्टोबर २०१९ अंतिम तारीख आहे. यानंतर हस्तलिखित वायूप्रदूषण तपासणी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नसून सदर वाहन वायूप्रदूषण केंद्रांची मान्यता आपोआप रद्द होईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर यांनी दिली आहे. यापूर्वी वाहनधारकांना हस्तलिखित वायूप्रदूषण प्रमाणपत्र चालत होते. यापुढे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वाहनधारकांना वायूप्रदूषण तपासणी आॅनलाइन पद्धतीने प्राप्त प्रमाणपत्र वाहन कागदपत्रे तपासणीत ग्राह्य धरली जाईल याची वाहनधारकांनी नोंद घेणे गरजेचे आहे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.