जनावरांची वाहतूक करणारे वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 06:27 PM2020-09-14T18:27:03+5:302020-09-14T18:28:50+5:30

पेठ : आपल्या खाजगी पिकअप वाहनातून विनापरवानगी क्षमतेपेक्षा जास्त जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनासह ७ जनावरे पेठ पोलीसांनी ताब्यात घेतली असून जवळपास २ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Vehicles transporting animals seized | जनावरांची वाहतूक करणारे वाहन जप्त

पेठ येथे विनापरवाना वाहतूक करणारी पोलीसांनी ताब्यात घेतलेली जनावरे.

Next
ठळक मुद्देएका गायीचा गुदमरल्याने दुर्देवी मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : आपल्या खाजगी पिकअप वाहनातून विनापरवानगी क्षमतेपेक्षा जास्त जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनासह ७ जनावरे पेठ पोलीसांनी ताब्यात घेतली असून जवळपास २ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पेठ पोलिसांनी दिलेल्या माहीतीनूसार रविवारी (दि.१३) रात्री तोंडवळ फाटा परिसरात महिंद्रा बोलेरो पिकअप (एम एच १५ एफ व्ही १७०३) मधून वाहतूक करत असतांना पेठ पोलीसांनी पकडला. तपासणी केली असता त्यात ३ गायी व ४ बैल अशी ७ जनावरे कोंबून भरण्यात आली होती. त्यातील एका गायीचा गुदमरल्याने दुर्देवी मृत्यू झाला.
पोलीसांनी ७ जनावरे व वाहनासह जवळपास २ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून जिवंत जनावरे नाशिकच्या पांझरापोळ येथे हलवण्यात आली आहेत. पोलीस हवालदार विजय भोये यांच्या फिर्यादीवरून संशयित लावेश रामकृष्ण मेसट (२५, अश्वमेघनगर, नाशिक) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप वसावे पुढील तपास करीत आहेत. या कामी पोलीस नाईक किरण बैरागी, शेख, फलाणे, खिरकाडे, भगरे, दिलीप रेहरे आदींनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Vehicles transporting animals seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.