कर्जाला कंटाळून वेहळगावला शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:53 PM2018-08-04T19:53:26+5:302018-08-04T19:53:44+5:30

 Vejalgaon farmer suicides in debt | कर्जाला कंटाळून वेहळगावला शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून वेहळगावला शेतकऱ्याची आत्महत्या

Next

साकोरा : नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथील शेतकरी बाबूराव दावल त्रिभुवन (४२) यांनी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून शनिवारी आत्महत्या केली. मूळ मळगाव (ता. नांदगाव) येथील रहिवासी शेतकरी बाबूराव त्रिभुवन हे गेल्या सात-आठ वर्षांपासून वेहळगाव येथील आंबेडकरनगर येथे वास्तव्यास होते. त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सन २००१ मध्ये ५३,८०० रुपयांचे पीककर्ज व शेतातील पाइपलाइनसाठी एक लाख २७ हजार २८६ रुपये एवढे कर्ज घेतले होते. दरवर्षीच्या नापिकीमुळे वेळेत कर्जफेड करता न आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. शनिवारी दुपारी नांदगाव ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी व सात वर्षांचा मुलगा आहे. नांदगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  Vejalgaon farmer suicides in debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.