मान्सूनपूर्व शेतीकामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 06:44 PM2019-05-31T18:44:08+5:302019-05-31T18:44:24+5:30
दिंडोरी तालुक्यात मान्सूनपूर्व शेतीकामांना वेग आला असून, बळीराजाचे पावसाकडे लक्ष लागले आहे.
Next
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात मान्सूनपूर्व शेतीकामांना वेग आला असून, बळीराजाचे पावसाकडे लक्ष लागले आहे.
दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात भात, नागली, वरई, उडीद आदी पिके घेतली जातात. ही पिके घेण्यापूर्वी शेतजमिनीची भाजवण करून नांगरणी व वखरणी केली जाते. मे महिन्यात रोहिणी नक्षत्रावर भात व नागलीची पेरणी केली जाते.
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, बळीराजा मशागतीला लागला आहे.