‘व्हेंडर मीट’मुळे विकासाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:38 AM2017-11-01T00:38:43+5:302017-11-01T00:38:52+5:30
मेक इन नाशिकच्या माध्यमातून सुरू झालेल्या वाटचालीची मुहूर्तमेढ व्हेंडर मीटच्या रूपाने रोवली गेल्याने नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि त्यातून रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी केला.
सातपूर : मेक इन नाशिकच्या माध्यमातून सुरू झालेल्या वाटचालीची मुहूर्तमेढ व्हेंडर मीटच्या रूपाने रोवली गेल्याने नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि त्यातून रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी केला. निमातर्फे हॉटेल गेट वे येथे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्र म आणि निमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेंडर डेव्हलपमेंट कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युनायटेड हिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजितसिंग सौध, गोवा शिपयार्डचे रविप्रकाश उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त करताना उद्योजकांनी एका क्षेत्रापुरते मर्यादित न राहता इतर क्षेत्राचाही शोध घ्यावा. ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निमाने आयोजित केलेल्या या उपक्र माचे कौतुक केले, तर उद्योग वाढीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक त्या सोयी-सुविधा देण्यासाठी तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, हर्षद ब्राह्मणकर, ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर, आशिष नहार आदी उपस्थित होते. प्रास्तविक निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी केले. सूत्रसंचालन समीर पटवा यांनी केले. सरचिटणीस श्रीकांत बच्छाव यांनी आभार मानले. यावेळी संजय सोनवणे, सुरेश माळी, संदीप भदाणे, सुधीर बडगुजर, एस. के. नायर, अनिल बाविस्कर, गौरव धारकर, मितेश पाटील, संदीप सोनार, मनीष रावळ, प्रीतम बागुल, अखिल राठी, प्रवीण वाबळे, अविनाश बोडके, नीरज बदलानी, महेश कुळकर्णी आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.