नाशिक पुणे रस्त्यावर विक्रेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:18 AM2020-12-30T04:18:52+5:302020-12-30T04:18:52+5:30

नाशिक : शहर सुशोभीकरणाबरोबरच वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या वाहतूक बेटांचा वापर जाहिरात फलके लावण्यासाठी केला जात आहे. उपनगर ...

Vendors on Nashik Pune Road | नाशिक पुणे रस्त्यावर विक्रेते

नाशिक पुणे रस्त्यावर विक्रेते

Next

नाशिक : शहर सुशोभीकरणाबरोबरच वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या वाहतूक बेटांचा वापर जाहिरात फलके लावण्यासाठी केला जात आहे. उपनगर चौक, त्र्यंबक नाका सिग्नल, द्वारका चौक, सारडा सर्कल आदी ठिकाणी वाहतूक बेटांबरोबरच दुभाजकांवरही फलकांचे अतिक्रमण झाल्याचे दिसते.

तरणतलाव मार्गावरील दुभाजक धोक्याचा

नाशिक रोड: येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावासमोरील रस्त्यावर अर्धवट स्थितीत असलेला दुभाजक वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. अरुंद रस्त्याच्या वळणावरच हा दुभाजक असल्याने अनेक वाहनधारक, तसेच चारचाकी वाहने दुभाजकावर आदळून अपघात घडत आहेत. दुभाजकाला रिफलेक्टरही नसल्याने रात्रीच्या सुमारास वाहने आदळत आहेत.

दत्त मंदिराबाहेर लागल्या रांगा

नाशिक : नाशिक रोड येथील तरणतलाव मार्गावरील दत्त मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गर्दी होऊ नये, म्हणून अनेक मंदिर देवस्थानने ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केलेली आहेत, परंतु लहन-मोठ्या मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, मंदिर प्रशासनाने मंदिरे खुली केली होती. त्यामुळे मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

नाशिक आगारात धूळच धूळ

नाशिक: एन.डी. पटेल रोडवरील एस.टी. महामंडळाच्या आगारात सर्वत्र खड्डे पडले असून, बसेसच्या वर्दळीमुळे आगारात सर्वत्र धूळ उडत आहे. या ठिकाणी असलेले वर्कशॉप, तसेच पेट्रोलपंप यामुळे सातत्याने येथे वाहनांची वर्दळ असते. विस्तीर्ण परिसर असला, तरी काँक्रिटीकरण उखडल्यामुळे आगारात सर्वत्र धूळ उडत असल्याने सर्वांनाच त्रास होत आहे.

क्रोमा कॉर्नरवरील सिग्नल धोक्याचा

नाशिक : नाशिक पुणे रोडवरील क्रोमा सिग्नलजवळ अशोका मार्गकडे जाणाऱ्या मार्गावरील खोदकाम केलेला रस्ता वाहनधारकांसाठी धोक्याचा ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनधारकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे पाठीमागील वाहन पुढील वाहनावर आदळत असल्याच्या घटना घडत आहेत. येथील खड्डा बुजविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Vendors on Nashik Pune Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.