कृषीमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील निकाल राखीव; सुनावणी पूर्ण; १ मार्चला ठरणार भवितव्य
By दिनेश पाठक | Updated: February 25, 2025 18:56 IST2025-02-25T18:55:23+5:302025-02-25T18:56:26+5:30
कोकाटे यांच्यातर्फे ॲड.अविनाश भिडे यांनी युक्तीवाद केला

कृषीमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील निकाल राखीव; सुनावणी पूर्ण; १ मार्चला ठरणार भवितव्य
दिनेश पाठक, नाशिक: कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला. १ मार्चला निकाल जाहीर केला जाणार असून अर्जावरील सुनावणी मंगळवारी (दि.२५) पूर्ण झाली. शिक्षेच्या स्थगितीवर सुनावणी घेण्यात आली. जिल्हा न्यायाधिश नितीन जीवने यांच्यासमाेर सरकार पक्षातर्फे ॲड.कोतवाल तर कोकाटे यांच्यातर्फे ॲड.अविनाश भिडे यांनी युक्तीवाद केला.
जिल्हा न्यायालयाने मंत्री कोकाटे यांच्यासह त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना कादपत्रांची फेरफार अन् फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाला कोकाटे यांना आव्हान देत शिक्षा स्थगितीसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर मंगळवारी सुनावणी पार पडली. न्या.जीवने यांनी निर्णय राखीव ठेवला. यावरील निकाल आता १ मार्चला दिला जाईल.