ग्रामिण भागातील खळे नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 05:08 PM2020-12-09T17:08:08+5:302020-12-09T17:08:57+5:30

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी दिवसेंदिवस अवगत तंत्रज्ञान तसेच पारंपरिक पद्धतीला फाटा देत आहे. माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल यूगाची कास धरत शेतीत बदल करू लागले आहेत.

On the verge of extinction in rural areas | ग्रामिण भागातील खळे नामशेष होण्याच्या मार्गावर

प्लॅस्टिक कागदावर तयार केलेली खळे, त्यावरील धांन्याची रास.

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांकडून दिला जातोय पारंपारीक अन‌् अवगत तंत्रज्ञानाला फाटा

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी दिवसेंदिवस अवगत तंत्रज्ञान तसेच पारंपरिक पद्धतीला फाटा देत आहे. माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल यूगाची कास धरत शेतीत बदल करू लागले आहेत.

नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून उत्पादन वाढीकडे कल झुकवीत असुन शेती उत्पादकतेमधुन लाखोंचे उत्पादन आणि नसीब आजमवत आहे. गव्हु, बाजरी, ज्वारी पिकांबरोबरच नगदी पिके कोथिंबीर, भोपळा, कोंबी, फ्लॉवर बरोबर मका, सोयाबीन, भुईमूग सारखी पिके करून लाखोंचे उत्पादन पदरी पाडून घेण्याकडे कल वाढत चालला आहे.
एकीकडे नवीन तंत्रज्ञान तर दुसरीकडे नामशेष होत चाललेली पारंपारिक शेतीपद्धती दिसून येत आहे. याचाच प्रत्येक शेती पद्धतीतील साठवणूक करणारी शेतखळे हे एक होय. मात्र तंत्रज्ञान शेती अवजारामुळे पारंपरिक खळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

पुर्वी शेतकरी गावाच्या शिवारात अथवा शेताच्याकडेला एक गोल आकाराचे खळे पाणी शिंपुन त्यावर दोन चार बैलाच्या जोडीची गोल फिरवून खळे तूडवून मग ते शेणाने सारवले जात असे. त्या खळ्यावर शेतात पिकलेली बाजरी सोंगणी करून खळ्यावर सूडी रचुन ठेवत. काम नाही त्यावेळी बाजरीचे कणीस मोडत असे. मग कणसावर बैलाची पात हाकून दिवसभर कणसे मळून, महिला खळ्यातच तिवई किंवा जमिनीपासून जरा उंच उभे राहून बाजरी उपणून तयार करत असत, मात्र तंत्रज्ञानाच्या अवगत शेती अवजारामुळे शेतातच शेताच्या कडेला किंवा घरापुढे मोठा प्लॉस्टीकवरच धान्य काढणीचे उपणेर आणून तासाभरात बाजरी असो कि ज्वारी, गहू तयार होतात. त्यामुळे खळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर दिवसेंदिवस पारंपरिक पद्धतीने शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. तर अवगत शेतीमुळे मजुर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. यांत्रिंकीकरणामुळे आता मजूर वर्ग हि कमी लागत आहे.
 

Web Title: On the verge of extinction in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.