शाळेच्या कर्मचाºयांची चारित्र्य पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:18 AM2017-09-26T01:18:49+5:302017-09-26T01:18:54+5:30
र व खुनाच्या प्रकारामुळे राज्यातील शिक्षण विभागाने खासगी शाळांमधील कर्मचाºयांच्या चारित्र्य पडताळणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील कर्मचाºयांची पोलीस पडताळणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागानेही जिल्ह्णातील खासगी शाळांना आदेश देत कर्मचाºयांची पडताळणी करण्यास कळविले आहे.
नाशिक : देशात व राज्यात सातत्याने खासगी शाळांमधील कर्मचाºयांनी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचार व खुनाच्या प्रकारामुळे राज्यातील शिक्षण विभागाने खासगी शाळांमधील कर्मचाºयांच्या चारित्र्य पडताळणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील कर्मचाºयांची पोलीस पडताळणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागानेही जिल्ह्णातील खासगी शाळांना आदेश देत कर्मचाºयांची पडताळणी करण्यास कळविले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या या आदेशान्वये सोमवारपासून (दि.२५) जिल्ह्णातील सर्व शाळांचा सुरक्षा, स्वच्छता व गुणवत्ता या तीन निकषांवर आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्णातील शाळांचा आढावा घेतला जाणार आहे. सोमवारी चांदवड व येवला येथील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायीत माध्यमिक शाळांचा आढावा झाला. आढाव्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळेतील सुरक्षा व प्रवासातील सुरक्षेबाबत आढावा घेतला जात आहे. सुरक्षेसोबत विद्यालयाची गुणवत्ता व स्वच्छता याबाबत आढावा घेतला जात आहे. शाळेचा परिसर स्वच्छ करण्यासाठी येत्या २ आॅक्टोबरच्या पंधरवड्यात स्वच्छता हीच सेवा हा उपक्र म राबविण्याचे आदेशदेखील देण्यात आलेले आहेत. याशिवाय माध्यमिकच्या प्रत्येक शाळेला त्यांच्या शाळा इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याचा अहवाल शिक्षण विभागाला सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाहनचालकांच्या वर्तनावरही लक्ष
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळेतील सुरक्षेसाठी खासगी स्वयंअर्थहायीत विद्यालयांमधील कर्मचाºयांची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थ्यांना घर ते शाळा या दरम्यानच्या सुरक्षेबाबतही योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. ग्रामीणसह शहरी भागात व्हॅन, रिक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यासाठी परिवहन समितीच्या माध्यमातून या वाहनचालकांच्या वर्तनावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.