पीएम किसान लाभासाठी कागदपत्रांची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:09 AM2020-02-03T00:09:03+5:302020-02-03T00:19:11+5:30
सिन्नर : पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. शेतकºयांना दिलेल्या कागदपत्रांतील चूक थेट ...
सिन्नर : पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. शेतकºयांना दिलेल्या कागदपत्रांतील चूक थेट गावात जाऊन प्रत्यक्ष सुधारणा करण्याचा नाशिक जिल्ह्यातील पहिला प्रयोग सिन्नर तालुक्यात करण्यात आला. त्याची सुरु वात तालुक्यातील डुबेरे येथून करण्यात आली. त्यात ११५ खातेदारांच्या कागदपत्रांतील चूक जागेवर दुरु स्ती करण्यात आल्या.
तहसीलदार राहुल कुताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक सी. बी. मरकड यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. शरद सानप, तृप्ती वाजे यांनी सर्व साधनांसह कागदपत्रांची लगेचच आॅनलाईन दुरूस्ती केली. ज्या गावांत जास्तीत जास्त शेतकºयांच्या विविध कागदपत्रांत चूक आहेत, त्यामुळे ते शेतकरी आत्तापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित आहे. अशा गावांत हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न तहसील विभागाने राबवला. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण वाजे यांच्या हस्ते त्यास सुरूवात करण्यात आली.
यावेळी गणेश वाजे, विकास वाजे, नामदेव मुजगुडे नवनाथ वाजे, बाळासाहेब बर्वे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेताना शेतकºयांकडून सुरुवातीलाच अत्यावश्यक कागदपत्रे घेण्यात आली होती. ही माहिती संगणकात भरताना जिल्ह्यातील काही शेतकºयांचे आधार क्र मांक चुकीचे नोंदले गेले होते. काहींच्या खाते क्रमांकाची माहिती चुकली. बँक खाते क्रमांकाची माहिती चुकीची झाली. त्यामुळे असे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेपासून अजूनही वंचित आहेत. त्यांना लाभ मिळावा यासाठी हा उपक्र म राबवण्यात आला. यात २२३ शेतकºयांच्या आधार क्रमांकात दुरूस्ती करण्यात आली. ११५ शेतकºयांचे खाते क्रमांक दुरूस्त झाले. १० शेतकºयांच्या बँक खाते क्रमांकाची दुरूस्ती करण्यात आली.