‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय दाखल्यांचे होणार ‘व्हेरिफिकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:12 AM2019-10-04T01:12:34+5:302019-10-04T01:13:18+5:30

नाशिक : निवडणूक ड्यूटी असलेले कर्मचारी वैद्यकीय कारण पुढे करीत निवडणूक ड्यूटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करीत असून, प्रसंगी वैद्यकीय दाखलादेखील सादर करीत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अशा कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय दाखल्यांची सत्यता पडताळून पाहणार आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी आता जिल्हा शल्य चिकित्सक आपल्या स्तरावरून करणार आहेत.

'Verification' of medical records of those employees | ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय दाखल्यांचे होणार ‘व्हेरिफिकेशन’

‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय दाखल्यांचे होणार ‘व्हेरिफिकेशन’

Next
ठळक मुद्देनिवडणूक कामे टाळत असल्याचे प्रकार

नाशिक : निवडणूक ड्यूटी असलेले कर्मचारी वैद्यकीय कारण पुढे करीत निवडणूक ड्यूटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करीत असून, प्रसंगी वैद्यकीय दाखलादेखील सादर करीत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अशा कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय दाखल्यांची सत्यता पडताळून पाहणार आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी आता जिल्हा शल्य चिकित्सक आपल्या स्तरावरून करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी विविध आस्थापनांमधील सुमारे ३० ते ३५ हजार कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले असून, पुन्हा एकदा उजळणीदेखील करण्यात आलेली आहे. मतदारसंघनिहायदेखील कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कामाला सुरुवात झालेली असतानाही अद्याप अनेक कर्मचारी हे वैद्यकीय कारणे पुढे करीत निवडणूक कामे टाळत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. सदर बाब जिल्हा निवडणूक शाखेच्या अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली होती.

Web Title: 'Verification' of medical records of those employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.