माकपच्या आंदोलनात पशुवैद्यकीय अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:19 AM2021-08-25T04:19:01+5:302021-08-25T04:19:01+5:30

ठाणापाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे माकपच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.२४) ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरू ...

Veterinary officers on edge in the CPI (M) movement | माकपच्या आंदोलनात पशुवैद्यकीय अधिकारी धारेवर

माकपच्या आंदोलनात पशुवैद्यकीय अधिकारी धारेवर

Next

ठाणापाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे माकपच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.२४) ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरू झालेले आंदोलन दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपुष्टात आले. या आंदोलनात विविध मागण्या, तसेच विषयांवर चर्चा करण्यात आली. सन २०१४-२०१५ पासून रखडलेल्या घरकुल हप्त्याबाबत उपस्थित असलेल्या सहायक गटविकास अधिकारी एस. जी. पाठक यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर देता आले नाही. यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त करीत त्यांना धारेवर धरले. अखेर आठ दिवसांत रखडलेल्या घरकुल हप्त्याची रक्कम बँकेत जमा करण्याची ग्वाही देण्यात आली.

हरसूल हा भाग डोंगर चढ-उताराचा असल्याने या भागात मुबलक पावसाचे पाणी पडूनही काही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांना विविध योजनांची अंबलबजावणी, बांध, खाचरे, शेततळे, शेती उपयोगी अवजारे, तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून नवीन तंत्रज्ञान अवगत पद्धत त्याचबरोबर जनावरांचे मोफत लसीकरण करण्याची मागणी करण्यात आली. शिरसगाव, भागओहळ, तसेच मूलवड, ओझरखेड येथील श्रेणी १ व २ चे पशुपर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी जनावरांच्या लसीकरणासाठी पैसे घेत असल्याचा आरोप उपस्थितांनी केल्याने शेख यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, तसेच लॅपी स्क्रीन डिसिज नावाच्या आजाराची लस भेट देण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार आर. एल. राठोड, जि. प. सदस्य रमेश बरफ, माजी पं. स. सभापती ज्योती राऊत, उपसभापती देवराम मौळे, पं. स. समिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. यू. शिंदे, डॉ. सुनील धांडे, तलाठी शरद खोडे, गुलाब चौधरी, हरसूल पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, उपनिरीक्षक डी. बी. शिरोळे, ग्रामसेवक संघटनेचे संदीप जाधव आदींसह पांडू दुमाडा, पंडित गावित, जयवंत राऊत, पुंडलिक महाले, नामदेव पागी, दिलीप भोये, भाऊराम किरकिरे, मजर शेख, रामदास चौधरी आंदोलनकर्ते उपस्थित होते. यावेळी हरसूल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

चौकट ....

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जनावरांची संख्या

गाय : २०,१८१

बैल :२२,४५९

म्हैस : ५,९५३

रेडे :४,१७४

शेळ्या : १६,१८१

ठाणापाडा येथील माकपच्या आंदोलनात मार्गदर्शन करताना सचिव इरफान शेख आदी.

240821\1614-img-20210824-wa0025.jpg

फोटो

Web Title: Veterinary officers on edge in the CPI (M) movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.