सिन्नर तालुक्यात मतदारांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:11 AM2019-04-30T01:11:17+5:302019-04-30T01:11:38+5:30
शहर व तालुक्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये सकाळी उत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत सिन्नर तालुक्यात सुमारे ४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दोन मतदान यंत्रात किरकोळ बिघाड होण्याव्यतिरिक्त मतदान शांततेत पार पडले.
सिन्नर : शहर व तालुक्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये सकाळी उत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत सिन्नर तालुक्यात सुमारे ४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दोन मतदान यंत्रात किरकोळ बिघाड होण्याव्यतिरिक्त मतदान शांततेत पार पडले.
मतदानासाठी सकाळीच मतदारांनी गर्दी केली होती. दुपारी कडक उन्हामुळे मतदान केंद्रावर फारशी गर्दी दिसून येत नव्हती. शहरासह ग्रामीण भागात मतदानाला तीन तासाचा अवधी शिल्लक राहिला असतांना मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले, त्यामुळे मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. तालुक्यात कोणत्या उमेदवाराला किती मते मिळतील याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. सकाळी कोकाटे, गोडसे व भुजबळ समर्थक मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून होते.
गंभीर तक्रार नाहीत
ग्रामीण भागातही मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. मतदार यादीत नाव नसल्याच्या कोणत्याही प्रकारच्या गंभीर तक्रार आल्या नाहीत. तालुक्यात पोलीस यंत्रणा व निवडणुक यंत्रणा प्रभावीपणे काम करतांना दिसून आली.