मनपा निवडणुकांसाठी आंबेडकर भवनाचा बळी

By admin | Published: July 21, 2016 01:03 AM2016-07-21T01:03:09+5:302016-07-21T01:05:05+5:30

कांगो : पदवीधरसाठी राजू देसले यांना उमेदवारी

Victim of Ambedkar Bhawan for Municipal Elections | मनपा निवडणुकांसाठी आंबेडकर भवनाचा बळी

मनपा निवडणुकांसाठी आंबेडकर भवनाचा बळी

Next

 नाशिक : मागील महिन्यात मुंबईचे आंबेडकर भवन पाडण्यामागे दलितांमध्ये फूट पाडण्याचा डाव सरकारचा होता. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार जातिअंताच्या चळवळीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत केला.
नाशिक विभागातून पदवीधर मतदारसंघाच्या चालू वर्षाच्या निवडणुकीसाठी प्रकाश (राजू) देसले यांना उमेदवारी देण्यात आल्याची अधिकृत घोषणा कांगो यांनी पत्रकार परिषदेत केली. जिल्हासचिव देसले हे मागील अनेक वर्षांपासून शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी पक्षाच्या माध्यमातून लढा देत आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा पक्षाने विचार केला असून सर्व १९ डाव्या संघटनांनी देसले यांना पाठिंबा दर्शविल्याचे कांगो यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, ते म्हणाले चैत्यभूमी, दीक्षाभूमी आणि आंबेडकर भवन या वास्तू बाबासाहेबांनी जनतेच्या पैशामधून उभ्या केल्या आहेत. एकीकडे सरकार बाबासाहेबांचे १२५वे जयंती वर्ष गाजावाजाने साजरे करत असताना दुसरीकडे सरकारच बाबासाहेबांचे विचार व त्यांच्या वास्तू नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, हा विरोधाभास कोणालाही मान्य नसून सरकारने आंबेडकर भवनाच्या पुनर्निर्माणासाठी कुठलाही अडथळा आणू नये, असे कांगो म्हणाले. तसेच सरकारने केलेली जीडीपी वाढ व महागाई नियंत्रणाचे दावे फोल ठरले आहेत. या सरकारने विकास आणि स्वयंरोजगाराचा संदर्भ जोडत विविध योजना गोंडस नावाखाली घोषित केल्या; मात्र भांडवलदारांचे हित साधत वनजमिनी त्यांच्या घशात घालून पर्यावरणाचा नाश करत भावी पिढीच्या हातात भकास विकास द्यायचा हे चुकीचे आहे. पर्यावरण, कामगार, रोजगार अशा सर्वच बाबतीत सरकारचे धोरण जनहिताच्या विरोधात असल्याचा आरोप कांगो यांनी बोलताना केला.
सर्व पुरोगामी विचाराचे पक्ष सरकारी धोरणांच्या विरोधात संघर्ष करण्यास तयार असून सर्व डावे पक्ष जनआंदोलन उभे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. २ सप्टेंबर रोजी कामगारविरोधी सरकारी धोरणांच्या निषेधार्थ राष्ट्रीय संप पुकारणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. यावेळी राजू देसले, पी. डी. धनवटे, अ‍ॅड. मनीष बस्ते आदि उपस्थित
होते.(प्रतिनिधी)

Web Title: Victim of Ambedkar Bhawan for Municipal Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.