दोन वर्षांत साठ झाडांचा बळी

By admin | Published: June 5, 2017 12:34 AM2017-06-05T00:34:39+5:302017-06-05T00:34:51+5:30

नाशिक : सलग दोन वर्षांपासून मान्सूनपूर्व पावसाचा वादळी वाऱ्यासह शहराला तडाखा बसत आहे.

The victim of sixty plants in two years | दोन वर्षांत साठ झाडांचा बळी

दोन वर्षांत साठ झाडांचा बळी

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सलग दोन वर्षांपासून मान्सूनपूर्व पावसाचा वादळी वाऱ्यासह शहराला तडाखा बसत आहे. गेल्या वर्षीदेखील मान्सून सुरू होण्याअगोदर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तीस झाडे उन्मळून पडली होती. याच घटनेची यंदाही शनिवारी (दि.३) पुनरावृत्ती झाली. दोन वर्षांत वादळी वाऱ्याने शहरातील साठ झाडांचा बळी गेल्याचे अग्निशामक विभागाकडे आलेल्या ‘कॉल’च्या नोंदीवरून स्पष्ट होते.
शनिवारी दुपारपासून शहरासह उपनगरीय भागांमध्ये अचानकपणे सुरू झालेला वादळी वारा व पावसाने शहरात एकूण तीस वृक्षांचा बळी घेतला. वृक्ष कोसळल्याने सुदैवाने कोठेही कोणालाही दुखापत झाली नाही. शहरातील विविध भागांमध्ये झाड कोसळून त्याखाली वाहने दबल्याच्याही घटना घडल्या आहेत. सिल्व्हरओक, काशिद, पॅतोडिया, गुलमोहर, अकेशिया, रेन ट्री, पेल्ट्राफ ोरम यांसारखे ठिसूळ प्रजातीचे वृक्ष वादळी वाऱ्याने कोसळल्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले.
सातपूर भागातील शिवाजीनगर, अशोकनगर, श्रीकृष्ण कॉलनी, मुंबई नाका, त्र्यंबकरोड, पंचवटी, दहीपूल, महात्मानगर, काठे गल्ली, कॉलेजरोड, पखालरोड आदि भागात वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
एकूणच गेल्या वर्षीदेखील जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसाने तीस झाडे कोसळली होती. यावर्षीदेखील तीस झाडे उद्ध्वस्त झाली आहेत. या घटनांमध्ये काही ठिकाणी वाहनांचे नुकसानही झाले आहे. बहुतांश ठिकाणी कोसळलेल्या झाडांमध्ये भारतीय प्रजातींचा समावेश नव्हता.यंदा वृक्षसंपदेला मोठा फटका
४यावर्षी महापालिकेने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबाजवणी करत गंगापूररोडवरील दुतर्फा असलेली झाडे भुईसपाट केली. यावेळी शेकडो वृक्ष भर उन्हाळ्यात जमीनदोस्त करण्यात आली. अशाच प्रकारे दिंडोरीरोड, पेठरोड, टाकळीरोड परिसरातही वाहतुकीला अडथळा होत असल्याने वृक्ष काढण्यात आले. शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याने तीस वृक्षांचा बळी घेतला. यामुळे यंदा शहरातील वृक्षसंपदेला मोठा फटका बसला आहे. महापालिकेने जेवढे वृक्ष तोडले त्या बदल्यात ठेकेदारांमार्फत लागवड केलेल्या रोपट्यांचे वृक्षांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याची अपेक्षा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केली जात आहे.

Web Title: The victim of sixty plants in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.