पिंपळगावी पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 06:20 PM2019-11-25T18:20:29+5:302019-11-25T18:26:58+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरातील अंबिका नगर तेथील महिलेला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन ६५ वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुत्र्याच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

The victim of a woman caught by a puppy dog | पिंपळगावी पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला महिलेचा बळी

शांताबाई पगार.

Next
ठळक मुद्देमोकाट कुत्र्याचा बंदोबस्त लावण्यात अपयश

पिंपळगाव बसवंत : परिसरातील अंबिका नगर तेथील महिलेला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन ६५ वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुत्र्याच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर घटना अशी की, शनिवारी (दि.१) अंबिका नगर येथील शांताबाई संतोष पगार (६५) या रस्त्याने जात असताना एका मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पायाचे लचके तोडत त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेनंतर नागरीकांनी त्यांना तात्काळ पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर २० दिवस उपचार सुरू होते. रविवारी (दि.२४) त्यांना एका खाजगी रु ग्णालयात नेले असता डाक्टरांनीॅ त्यांना पुन्हा जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. व सोमवारी (दि.२५) त्यांना जिल्हा रुग्णालयात नेताना त्यांंचे निधन झाले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

चौकट.....
आई-वडिलांविना मुले झाली पोरकी...
२० वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर शांताबाई यांनी मोलमजुरी करून आपल्या दोन मुली व मुलाचे संगोपन करून त्याना वाढविले, त्यांचे लग्न करून दिले व आपल्या मुला व नातवंडांसोबत समाधानाने दिवस काढत असताना त्यांना पिसाळलेल्या कुत्रा चावल्याने त्यांना मृत्यू झाल्याने कुटूंबावर मोठा आघात झाला आहे.

मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त लावण्यात अपयश
पिसाळलेले श्वान अजूनही परिसरात मोकाट असून वाहनाचालक व पायी जाणाऱ्या नागरिकांवर ते धशवून जात असल्याने डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या पिसाळलेल्या कउत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पण या घटनेला २५ दिवस होऊनही कुत्र्याचा बंदोबस्त लावायला प्रशासनाला मुहूर्त सापडत नाही.


कोट....
शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे दिसते. नाशिक शहरातून महापालिकेने पकडलेली मोकाट कुत्री पिंपळगाव बसवंत हद्दीत आणून सोडली जातात, अशी शहरात चर्चा आहे. यांची माहिती घेऊन संबंधित विभागाची तक्र ार करणार आहे.
- गणेश बनकर
ग्रामपंचायत सदस्य, पिंपळगाव बसवंत.

पिसाळलेल्या कुत्र्याने आतापर्यंत अनेक जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. व एका महिलेला देखील आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही येथील स्थानिक प्रशासन मूग गिळून आह.े ही मोठी शोकांकिता आहे. अजून मोठा प्रसंग ओढू नये म्हणून त्वरीत शहारातील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे.
- उद्धवराजे शिंदे, नागरिक.




 

Web Title: The victim of a woman caught by a puppy dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.