फटाक्यांच्या धडाक्याने पक्ष्यांचा बळी

By admin | Published: November 15, 2015 11:24 PM2015-11-15T23:24:06+5:302015-11-15T23:25:15+5:30

निसर्गाची हानी : शेकडो पक्षी पडतात मृत्युमुखी, नाशिकमध्ये सोशल मीडियावर चळवळ सुरू

Victims of birds by the crackers | फटाक्यांच्या धडाक्याने पक्ष्यांचा बळी

फटाक्यांच्या धडाक्याने पक्ष्यांचा बळी

Next

फटाक्यांच्या धडाक्याने पक्ष्यांचा बळीनिसर्गाची हानी : शेकडो पक्षी पडतात मृत्युमुखी, नाशिकमध्ये सोशल मीडियावर चळवळ सुरूअझहर शेख ल्ल नाशिक
दीपावलीचा सण हा सर्वांत मोठा उत्सव असला तरी तो जल्लोषात साजरा करताना पर्यावरणपूरकच साजरा करावा यासाठी भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण सर्वत्र फटाक्यांच्या धडाक्यामुळे होणारे प्रदूषण हे मानवी आरोग्यास अपायकारक ठरतेच, परंतु त्यापेक्षाही भीषण प्रकार पशु-पक्ष्यांच्या बाबतीत घडतात. यंदाही दिवाळीत झालेल्या आतषबाजीमुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागल्याचे पर्यावरणप्रेमींच्या निरीक्षणातून समोर आले आहे.
सण- उत्सव साजरे करताना सजीवसृष्टीला अपायकारक ठरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातूनच अनेक पर्यावरणप्रेमींनी मकर संक्रांतीच्या वेळी पतंगोत्सवासाठी नायलॉन बंदीसाठी विविध स्तरांवर केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. तरीही चोरी-छुप्या पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या मांजामुळे पक्षी जायबंदी होतात. आताही दिवाळीत फटाक्यांच्या धुमधडाक्यामुळे पक्ष्यांना हादरे सहन करावे लागत आहेत. शांत निसर्गरम्य वातावरणात जीवन जगणारा सजीव म्हणजे पक्षी. पक्ष्यांना फटाक्यांचा आवाज किंबहुना मोठ्या आवाजाची अजिबात सवयच नसते. त्यामुळे प्रकाशाच्या दीपावलीचा उत्सव सुरू झाला की फटाक्यांचे आवाज आणि त्याद्वारे होणारे वायू प्रदूषण पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे ठरते.
पक्ष्यांचा अधिवास असलेल्या झाडांच्या परिसरात अचानकपणे फटाके फुटू लागताच पक्षी बिथरतात आणि घबराट होऊन काही मृत्युमुखी पडतात, तर काही आवाजापासून लांब जाण्यासाठी रात्रीच्या अंधाराची पर्वा न करता भरारी घेतात; मात्र त्यांची ही भरारीदेखील जीवघेणी ठरते. कारण रात्रीच्या अंधारामुुळे विहार करताना अडथळ्यांचा अंदाज पक्ष्यांना येत नाही. परिणामी कृत्रिम अडथळ्यांवर आदळ-आपट होऊन पक्षी जमिनीवर कोसळतात.
दरवर्षी दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने पक्षी बेघर होतात, तर काही मृत्युमुखी पडतात आणि बहुसंख्य पक्ष्यांना कायमस्वरूपी बहिरेपणाचाही सामना करावा लागतो; मात्र या सर्व धोक्यांचा स्वार्थी मानवप्राण्याकडून कसलाही विचार होताना दिसत नाही. क्षणभराचा फटाक्यांचा आनंद अनेक पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो. नाशिकमध्ये यासंदर्भात अनेक संस्थांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. त्यामुळे आता पक्षिप्रेमींनी याबाबत मोहिमा राबविण्याची गरज असून तशी चळवळ नाशिकमध्ये सुरू करण्यात आल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले.

Web Title: Victims of birds by the crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.