आधुनिकता आणि अंधश्रद्धेचा ‘बळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:44 AM2018-12-19T00:44:33+5:302018-12-19T00:44:50+5:30
आधुनिकतेच्या काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या गोष्टी जरी केल्या जात असल्या तरी राज्यातील बहुतांश खेड्यापाड्यांत आजही अंधश्रद्धेला वाव मिळत आहे. अंधश्रध्देची खोलवर रूजलेली पाळेमुळे उखडून फेकण्यास अद्यापही अपयश येत असून, यामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त होत असले तरी त्याकडे फ ारसे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही, यावर रंगमंचावरून ‘बळी’च्या प्रयोगाद्वारे प्रकाश टाकला गेला.
नाशिक : आधुनिकतेच्या काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या गोष्टी जरी केल्या जात असल्या तरी राज्यातील बहुतांश खेड्यापाड्यांत आजही अंधश्रद्धेला वाव मिळत आहे. अंधश्रध्देची खोलवर रूजलेली पाळेमुळे उखडून फेकण्यास अद्यापही अपयश येत असून, यामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त होत असले तरी त्याकडे फ ारसे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही, यावर रंगमंचावरून ‘बळी’च्या प्रयोगाद्वारे प्रकाश टाकला गेला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत मंगळवारी ललित कला भवन, जळगाव, मेहरुण वसाहतच्या वतीने ‘बळी’ या नाटकाचा प्रयोग परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सादर करण्यात आला. सत्य घटनेवर आधारित या नाटकाच्या कथानकातून अंधश्रद्धेचा बळी ठरणारी ग्रामीण जनता आणि अंधश्रद्धेविषयीची जनजागृती या विषयाला धरून कथा सादर करण्यात आली. पारंपरिक बुरसटलेली विचारसरणी, निरक्षरता आणि त्याचा आजच्या पिढीवर होणारा परिणाम यामुळे एका सामान्य कुटुंबाची होणारी घुसमट या नाटकात दाखविण्यात आली. रुपाली गुंगे लिखित व बापूराव गुंगे दिग्दर्शित या नाटकात निशा पाटील, जगदीश नेवे, मानसी नेवे, निखिल शिंदे, रेषा गुंगे, रत्ना ठाकरे, नीलेश रायपूरकर, योगेश हिवरकर, भूषण निकम, आनंद जोशी यांसह कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. — आजचे नाटक — डार्लिंग