पोर्टलवरील बळी प्रथमच दोन आकड्यांत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:33+5:302021-06-22T04:11:33+5:30

नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. २१) एकूण ७ बळी गेले असून, पोर्टलवर प्रथमच बळींची संख्या दोन आकड्यांत ७२ इतकी ...

Victims on the portal in double digits for the first time! | पोर्टलवरील बळी प्रथमच दोन आकड्यांत !

पोर्टलवरील बळी प्रथमच दोन आकड्यांत !

Next

नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. २१) एकूण ७ बळी गेले असून, पोर्टलवर प्रथमच बळींची संख्या दोन आकड्यांत ७२ इतकी नोंदविली गेली आहे. या बळींच्या नोंदीमुळे जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या ८०३८ वर पोहोचली आहे. दरम्यान, सोमवारी आतापर्यंतची सर्वांत कमी रुग्णसंख्या १०६ वर आली असून, १४४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

जिल्ह्यात सोमवारी अपडेट केलेल्या ७२ बळींमध्ये नाशिक मनपाचे ४६, नाशिक ग्रामीणचे २५, तर मालेगाव मनपाच्या एका बळीचा समावेश आहे. नवीन कोरोनाबाधितांमध्ये ५४ नाशिक मनपा क्षेत्रातील, ४४ नाशिक ग्रामीणचे, ०३ मालेगाव मनापातील, तर ०५ जिल्हाबाह्य रुग्णांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बळींचे अपडेट करण्यासाठी शनिवारपर्यंतची अंतिम मुदत दिल्यानंतरही सोमवारपर्यंत अपडेट मृत्यूची भर पडतच असल्याने एकूण बळींच्या आकड्याने तब्बल आठ हजारांचा आकडा ओेलांडला आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल पुन्हा हजारपार

जिल्ह्यात प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा हजाराचा आकडा ओलांडून ११५३ पर्यंत गेली आहे. त्यात ५६६ अहवाल नाशिक ग्रामीणचे, २५७ नाशिक मनपाचे, तर ३३० अहवाल मालेगाव मनपा क्षेत्रातील आहेत. दरम्यान, उपचारार्थी रुग्णसंख्या अडीच हजारपेक्षाही कमी २४१० वर आली असून, कोरोनामुक्त होण्याचा दर ९७.३४ वर पोहोचला आहे.

Web Title: Victims on the portal in double digits for the first time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.