पिडितांची पोलीस ठाण्यात धाव : विवाहचे आमीष दाखवून युवतींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:02 PM2020-06-07T17:02:32+5:302020-06-07T17:05:32+5:30

लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार देऊन पिडीतेस मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Victims run to police station: Atrocities on young women by showing the lure of marriage | पिडितांची पोलीस ठाण्यात धाव : विवाहचे आमीष दाखवून युवतींवर अत्याचार

पिडितांची पोलीस ठाण्यात धाव : विवाहचे आमीष दाखवून युवतींवर अत्याचार

Next
ठळक मुद्देहात पकडून शिवीगाळ करत विनयभंग केलावेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केले

नाशिक :  लग्नाचे अमिष दाखवून विविध दोन घटनांमध्ये शहरातील दोन महिलांवर अत्याचार करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी मुंबईनाका तसेच पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अब्रार नुरमोहम्मद शेख (३९, रा. अनहत सोसायटी, पखालरोड,) असे पहिल्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार फेब्रुवारी २०१७ पासून ते आतापर्यंत अब्रार याने पिडीतेस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केले. लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार देऊन पिडीतेस मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना पंचवटी परिसरात घडली. या प्रकरणी पिडीत महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित हिरालाल जुलाल दाभाडे (४७, रा. पिंपळवाडे, ता. अंमळनेर) याने २००८ पासून आतापर्यंत वेळोवेळी जबरदस्तीने पिडीतेवर अत्याचार केले. तसेच मोटारसायकल तसेच घर बांधण्यासाठी पिडीतेकडून पैसे घेतले. परंतु ते परत केले नाहीत. पैशांची मागणी केली असता शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

लग्नासाठी जबरदस्ती करत विनयभंग
नाशिक : लग्न करण्यासाठी सोबत जाण्यास नकार देणार्‍या महिलेचा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि.१)नाशिकरोड परिसरात घडली.
कार्तीक प्रकाश रजोरिया, दर्शन प्रकारश रजोरिया, प्रकाश वेणुराज रजोरिया, ललीता प्रकाश रजोरिया(रा. सर्व देवळाली गाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्ररीनुसार कार्तीक राजोरिया व त्याच्या कुटुंबियांनी पिडीत महिलेच्या घरात घुसून कार्तीकला तीच्याशी जबरदस्तीने लग्न करण्यासाठी सोबत चल अशी धमकी दिली. पिडीतेने नकार देताच तीचा हात पकडून शिवीगाळ करत विनयभंग केला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ए.एस. मुसळे करत आहेत.

 

Web Title: Victims run to police station: Atrocities on young women by showing the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.