विजयी महिलांनी केला ग्रामविकासाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 09:56 PM2021-01-20T21:56:05+5:302021-01-21T00:57:21+5:30

नाशिक : ग्रामविकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे माध्यम मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या यंदाच्या निवडणूकीत ५० टक्क्याहून अधिक महिला विजयी झाल्याने गावगाडा हाकण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने त्यादेखील कारभारी ठरल्या आहेत.

The victorious women decided on rural development | विजयी महिलांनी केला ग्रामविकासाचा निर्धार

विजयी महिलांनी केला ग्रामविकासाचा निर्धार

Next
ठळक मुद्देयंदाच्या निवडणूकीत युवा वर्गाचा सहभाग सर्वाधिक

नाशिक : ग्रामविकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे माध्यम मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या यंदाच्या निवडणूकीत ५० टक्क्याहून अधिक महिला विजयी झाल्याने गावगाडा हाकण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने त्यादेखील कारभारी ठरल्या आहेत.

जिल्ह्यात ५६५ ग्रामपंचायतींमध्ये ४२२९ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत ११ हजार ५६ उमेदवारांनी नशीब आजमावले. यावेळच्या निवडणूकीत युवा वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. विशेष म्हणजे पुरुषांहून अधिक महिला विजयी झाल्याचे दिसून आले. यात २५३७ महिलांनी ग्रामपंचायतीत प्रवेश केला असून ग्रामविकासासाठी योगदान देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीचा लेखाजोखा

निवडणूका झालेल्या ग्रामपंचायती
५६५
निवडून आलेले उमेदवार
४२२९
ग्रा.पं. निवडणुकीत विजयी महिला उमेदवार
२५३७

सिन्नर तालुक्यात महिलांचे वर्चस्व
सिन्नर तालुक्यात १०० ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यात सर्वाधिक ५६० महिला उमेदवार विजयी झाल्या. या तालुक्यात मुसळगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्वात जास्त ९ तर मुसळगाव ग्रामपंचायतीत ८ महिला उमेदवार विजयी झाला. पहिल्यांदाच महिला इतक्या मोठ्या संख्येने रिंगणात उतरल्या होत्या.

विजयी महिला उमेदवारांच्या प्रतिक्रिया
गावातील पिण्याचा पाण्याचा तसेच स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर देणार आहे. तसेच बचतगटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण व आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी जोड व्यवसाय उभा करुन आर्थिक दुर्बलता दूर करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे.
- पुजा आहेर, ग्रामपंचायत, न्यायडोंगरी.

गाव समस्यामुक्त तसेच सर्वगुणसंपन्न करण्याचे ध्येय मी डोळ्यासमोर ठेवले आहे. मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावास विकास घडवून आणणे हिच माझ्या विजयाची पावती असेल.
- ज्योतीताई मोगल, ग्रामपंचायत, लखमापूर.

कनाशी गावातील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करुन तीर्थक्षेत्र विकास निधीतून परिसराचा विकास करणार असून गावात नवीन नळ पाणीपुरवठा योजनासह गावांतर्गत रस्ते विकासाला प्राधान्य देणार, महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार सांस्कृतिक भवनची निर्मिती करुन मंगल कार्यालयाचे सुशोभिकरण करणार.
- वैशाली शिरसाठ, ग्रामपंचायत, कनाशी.

Web Title: The victorious women decided on rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.