आंबे दिंडोरीत ग्रामविकास पॅनलचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 06:41 PM2021-01-19T18:41:27+5:302021-01-19T18:42:07+5:30

जानोरी : आंबे दिंडोरी (ता. दिंडोरी) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सागर गायकवाड व सुभाष वाघ यांच्या ग्राम विकास पॅनलला सर्वच्या सर्व नऊ जागा मिळून एक हाती सत्ता मिळाली आहे, तर कैलास गणोरे यांच्या पॅनेलला एकही जागा न मिळाल्याने त्यांचा दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Victory of Rural Development Panel in Ambe Dindori | आंबे दिंडोरीत ग्रामविकास पॅनलचा विजय

आंबे दिंडोरीत ग्रामविकास पॅनलचा विजय

googlenewsNext
ठळक मुद्देग्राम विकास पॅनलला सर्वच्या सर्व नऊ जागा

जानोरी : आंबे दिंडोरी (ता. दिंडोरी) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सागर गायकवाड व सुभाष वाघ यांच्या ग्राम विकास पॅनलला सर्वच्या सर्व नऊ जागा मिळून एक हाती सत्ता मिळाली आहे, तर कैलास गणोरे यांच्या पॅनेलला एकही जागा न मिळाल्याने त्यांचा दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

वार्ड निहाय विजयी उमेदवार मिळालेली मते याप्रमाणे वॉर्ड एक गोकुळ ब्राह्मणे (३९७), रत्ना फसाळे (४१९), रूपाली वाघ (४०१), वार्ड क्रमांक दोन मंगेश कराटे (३५६), हिराबाई भिसे (३१२), संगीता खर्डे (३२२) वार्ड क्रमांक तीन सागर गायकवाड (४२५), मोतीराम पिंगळा (३५७), आशा केंग (३८९) याप्रमाणे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. यावेळी दिंडोरी सभापती कामिनी चारोस्कर, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर काठे, सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, ग्रामपंचायत सदस्य शंकर वाघ, विष्णुपंत काठे, दत्तात्रेय घुमरे, अशोक केंग, बीजेपी दिंडोरी तालुका सरचिटणीस योगेश तिडके, निवृत्ती घुमरे, गोटीराम वाघ, शंकर चारोस्कर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अंबे दिंडोरी ग्रामस्थांनी ग्रामविकास पॅनलवर विश्वास ठेवून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करून दिला आहे . तो विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू व आंबे दिंडोरीचा विकास करून गावाचा कायापालट करून दाखवल्याशिवाय राहणार नाही.
- सागर गायकवाड, नवनिवार्चित सदस्य.                 

Web Title: Victory of Rural Development Panel in Ambe Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.