वडाळागावातील पिंगुळबाग वसाहतीजवळ अंधश्रद्धेपोटी वृक्षाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:01 AM2019-01-24T01:01:11+5:302019-01-24T01:01:27+5:30

एकीकडे विज्ञानाने प्रगती केली असता, दुसरीकडे अंधश्रद्धेचे गारुड अद्यापही लोकांवर कायम असून, त्यातूनच वडाळागावातील पिंगुळबाग वसाहतीजवळ अशाच अंधश्रद्धेपोटी वृक्षाला खिळे ठोकून बळी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Victory of superstition tree near Pingulbagh colony of Wadalagav | वडाळागावातील पिंगुळबाग वसाहतीजवळ अंधश्रद्धेपोटी वृक्षाचा बळी

वडाळागावातील पिंगुळबाग वसाहतीजवळ अंधश्रद्धेपोटी वृक्षाचा बळी

Next

इंदिरानगर : एकीकडे विज्ञानाने प्रगती केली असता, दुसरीकडे अंधश्रद्धेचे गारुड अद्यापही लोकांवर कायम असून, त्यातूनच वडाळागावातील पिंगुळबाग वसाहतीजवळ अशाच अंधश्रद्धेपोटी वृक्षाला खिळे ठोकून बळी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त करून भोंदू बाबाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
वडाळागावात एक मांत्रिक बाबा असून, त्याच्याकडील शक्तीमुळे समस्या, प्रश्न, अडचणी चुटकीसरशी सुटतात, अशी वदंता आहे. त्यामुळे त्याच्याकडे नाशिकसह परजिल्ह्यातून नागरिक विविध समस्या घेऊन येत असून, अशा लोकांचे प्रश्न समजावून घेतल्यानंतर त्यांना उतारा म्हणून पिंगुळबाग वसाहतीच्या पुढे असलेल्या एक झाडाला वृक्ष असून, त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीने चप्पल, लिंबू खिळ्याने ठोकावा असे सांगितले जाते. असे केल्याने समस्या सुटण्यास मदत होईल, असा दावा केला जात असल्यामुळे सदर झाडाला शेकडो लिंबू खिळ्याने ठोकण्यात आले आहेत, तसेच चामडी चप्पलादेखील असंख्य खिळे ठोकून लटकविण्यात आल्या आहे. त्यामुळे झाड ठोकलेल्या खिळ्यांमुळे सुकू लागले आहे.
मांत्रिक बाबाचे काही दलाल असून, त्यांच्याकरवी भोळ्याभाबड्या नागरिकांना आणून त्यांची फसवणूक केली जात आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची वाहतूक करण्यासाठी काही रिक्षाचालकांचाही हात असून, अव्वाच्या सव्वा पैसे उकळून प्रवासी वाहतूक केली जात आहे. या साºया प्रकाराची चौकशी करून अंधश्रद्धेला खतपाणी घालणाºया तसेच झाडाचा बळी घेणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Victory of superstition tree near Pingulbagh colony of Wadalagav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक