युतीच्या विजयाने समर्थकांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:32 AM2019-05-24T01:32:33+5:302019-05-24T01:32:58+5:30

लोकसभा निवडणूक मतदान मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जसेजसे पहिल्या-दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर होऊ लागले तसतसे परिसरातील हमरस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती.

 The victory of supporters of the alliance | युतीच्या विजयाने समर्थकांचा जल्लोष

युतीच्या विजयाने समर्थकांचा जल्लोष

Next

नाशिकरोड : लोकसभा निवडणूक मतदान मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जसेजसे पहिल्या-दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर होऊ लागले तसतसे परिसरातील हमरस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. तर शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. हेमत गोडसे विजयाकडे वाटचाल करत असताना शहरात ठिकठिकाणी फटाके फोडण्यात येत होते. तसेच पेढे वाटून गुलालाची उधळण करण्यात आली.
लोकसभा निवडणूक मतदानानंतर कोण विजयी होणार, कोणाची सत्ता येणार याबाबत सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्वत्र विजय-पराजयाचीच चर्चा सुरू होती.
गुरुवारी सकाळी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या-दुसºया फेरीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली. दुपारी साडेअकरा वाजेनंतर देशातील चित्र आणखी स्पष्ट होण्यास सुरुवात झाल्याने युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. व्यापारी पेठेतदेखील मतमोजणीचा फिव्हर बघायला मिळाला. नाशिकरोड येथे दुपारपासून निवडणुकीचे वातावरण होते.
नासर्डी ते पाथर्डी आनंदोत्सव
इंदिरानगर : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल नासर्डी ते पाथर्डी या परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या एक महिन्यात टप्प्याटप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. त्याची मतमोजणी आज गुरु वार (दि.२३) रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु वात झाली. जसजसे निकाल महायुतीच्या बाजूने वाढू लागले तसतसे शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण झाला. नासर्डी ते पाथर्डी यामध्ये प्रभाग २३ मध्ये भाजपाचे चार नगरसेवक, प्रभाग ३० मध्ये भाजपचे चार नगरसेवक आणि प्रभाग क्र मांक ३१ मध्ये शिवसेनेचे दोन नगरसेवक व भाजपचे दोन असे एकूण बारा नगरसेवक आहेत त्यामुळे दुपारपासूनच भाजप-शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यास सुरु वात झाली होती. सायंकाळ होताच जल्लोषात अजून वाढ झाली होती. परिसरातील मिठाईच्या दुकानात पेढ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आली. इंदिरानगर, राजीवनगर, दिपालीनगर, राणेनगरसह परिसरात सर्वत्र चौकाचौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
विविध संपर्क कार्यालयात गर्दी
नासर्डी ते पाथर्डी भाजपा-शिवसेनेचे नगरसेवक असल्याने या दोन्ही पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. प्रभागातील प्रत्येक नगरसेवकाने सायंकाळ होताच आपल्या संपर्ककार्यालयावर फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
४विविध संपर्क कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विशेषत: भाजपा नगरसेवक सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, चंद्रकांत खोडे, सुप्रिया खोडे, रूपाली निकुळे, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड, शाहिन मिर्झा, शिवसेना नगरसेवक सुदाम डेमसे, संगीता जाधव यांच्या संपर्क कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सिडको परिसरात पेढे वाटप करून विजयाचा जल्लोष
सिडको : भारतीय जनता पार्टीने राज्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ढोलताशांच्या गजरात नाचत गाजत पेढे वाटप करून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी सीमा हिरे, नगरसेवक छाया देवांग, प्रतिभाताई पवार, भाग्यश्री ढोमसे, सिडको मंडल अध्यक्ष बाळासाहेब पाटील, महेश हिरे, जगन अण्णा पाटील, नगरसेवक भगवान दोंदे, मनोज बिरार, रवींद्र पाटील, गणेश ठाकूर, प्रकाश चकोर सुहास देशपांडे, माधवी मोराणकर, निर्मला पाटील, कृष्णा धोंडगे, गणेश अरिंगळे, एकनाथ नवले, अशोक पवार, डी. डी. राजपूत, अविनाश पाटील, अनिल कासार, प्रवीण सोनवणे, डॉ. गोपाल सिसोदे, डॉ. वैभव महाले, नवनाथ पारखे, वासंती जावळे, डॉ. मनीषा दराडे, रश्मी हिरे, ऋचा हिरे आदी उपस्थित होते. यावेळी सीमा हिरे यांनी सांगितले की, हा जनतेचा व विकासाचा विजय आहे. प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिल्याने जनतेचे आभार मानते.

Web Title:  The victory of supporters of the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.